Published On : Sat, Jun 29th, 2024
By Nagpur Today Nagpur News

विदर्भाच्या पदरी पुन्हा निराशाच; जुन्या योजना सजवून पुन्हा केल्या सादर

Advertisement

नागपूर : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पा त्यांनी मोठमोठ्या घोषणा केल्याचे पाहायला मिळाले. मात्र सरकारने विदर्भासाठी जुन्या घोषणा नव्याने मांडल्याचे पाहायला मिळाले.

विदर्भासाठी सरकारच्या घोषणा:
-गोसीखुर्द धरणाचे ६५.५७ टीएमसी पाणी वैनगंगा-नळगंगा प्रकल्पातून वळविण्यात येणार आहे.नियोजनामुळे नागपूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशीम, अमरावती येथील 3 लाख 71 हजार 277 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे.

Today’s Rate
Tuesday 01 Oct. 2024
Gold 24 KT 75,500 /-
Gold 22 KT 70,200 /-
Silver / Kg 90,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

– कापूस, सोयाबीन उत्पादकता वाढवण्यासाठी 341 कोटींचा निधी, विदर्भातील लाखो शेतकऱ्यांना होणार फायदा
– नागपूर, अमरावती, यवतमाळच्या आयटीआय महाविद्यालयांमध्ये सेंट्रल ऑफ एक्सलन्सची स्थापना
-अमरावती, बुलढाणा, वाशिम, वर्धा, भंडारा, गडचिरोली येथे 430 खाटांचे नवीन वैद्यकीय रुग्णालय
-अमरावती, बुलढाणा, वाशिम, वर्धा, भंडारा, गडचिरोली येथे 100 सेवन क्षमता असलेली वैद्यकीय महाविद्यालये.
– विदर्भातील सर्व महापालिकांमध्ये पीएम-ई बस योजना लागू
– वर्धा-अमरावती येथील एंडोमेंट आयुक्त कार्यालयाचे 125 कोटी रुपयांचे नूतनीकरण
– नागपूर जिल्ह्यातील रामटेक मंदिराच्या विकासासाठी 211 कोटींचा निधी जाहीर
– नागपूर जिल्ह्यातील मौदा येथे बाबा जुमदेवजींच्या स्मारकाचे बांधकाम, 77 कोटींचा निधी मंजूर
– अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे श्री संत रुपलाल महाराज यांच्या स्मारकाचे बांधकाम.

Advertisement