कामठी :- मागील ऑगस्ट महिन्यात यादवनगर येथील मानसिंग यादव नामक इसमाचा डेंग्यू सदृश आजाराने मृत्यू झाल्याच्या घटनेला विराम मिळत नाही तोच जरीपटका नागपूर येथील डाक विभागात कार्यरत असलेले कर्मचाऱ्याचा डेंग्यूसदृश्य आजराने उपचारदारम्यान दुखद निधन झाल्याची घटना आज पहाटे 5 वाजता नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात घडली असून मृतक इसमाचे नाव दिनेश गुलाबराव खोब्रागडे वय 57 वर्षे रा यशोधरा नगर कामठो असे आहे.
प्राप्त माहितीनुसार सदर मृतक दिनेश खोब्रागडे हे दोन दिवसांपूर्वी नोकरी करून सायंकाळी घरी परतले असता अचानक प्रकृती बिघडल्याने कामठी येथील प्रांजल हॉस्पिटल ला दाखल करण्यात आले मात्र परिस्थिती नाजूक झाल्याने उपचारार्थ त्वरित नागपूर च्या क्रीम्स हॉस्पिटल मध्ये दाखल केले असता आज पहाटे 5 वाजता दुःखद निधन झाले असून मृतकाच्या पार्थिवावर येथील राणी तलाव मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.मृतकाच्या पाठीमागे पत्नी व एकुलता एक मुलगा असा आप्तपरिवार आहे.
संदीप कांबळे कामठी