नागपूर : राज्यात वाढती गुन्हेगारी पाहता ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर हल्लाबोल केला. तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची देखील मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे.
महाराष्ट्रात सध्या जे काही चालले, त्यावरून आपलं भविष्य ह्या गुंडांच्या हाती द्यायचं का? असा संतप्त सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. तसेच राज्य सरकार बरखास्त करा आणि राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच ताबडतोब निवडणुका घ्या, असेही ठाकरे म्हणाले.
‘भाजप में आओ, सब भूल जाओ‘ ही गुंडांसाठी ‘मोदी गॅरंटी’,असा टोलाही त्यांनी लगावला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असे बोलले की, श्वान गाडी खाला आला तर राजीनामा देऊ का म्हणाले. कुत्रा काय सगळ्या प्राण्याची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही दिल्लीश्वेर समोर कुत्र्यासारखी शेपटी हलवतात अशी बोचरी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
अभिषेक घोसाळकरवर गोळ्या मॉरीसने चालवल्या की आणखी कुणी चालवल्या? त्या दोघांनाही मारण्याची सुपारी आणखी कुणी दिली होती का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच अभिषेक घोसाळकर आणि मॉरिसचा फेसबुक लाईव्हचा व्हिडीओ समोर आला. पण गोळ्या झाडतानाचं दिसतं. पण कोण झाडतंय हे दिसत नाही. मॉरिसने बॉडीगार्डच्या शस्त्रातून गोळ्या चालवल्या. त्या गोळ्या खरचं त्याने चालवल्या की आणखी कोणी चालवल्या? त्या दोघांना मारण्याची सुपारी आणखी कोणी दिली होती का, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.