Published On : Sat, Oct 19th, 2024
By Nagpur Today Nagpur News

महाविकास आघाडीत जागावाटपावरून वाद; काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

Advertisement

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या बैठकीत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात वाद झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप सुरळीत व्हावं, यासाठी काँग्रेसकडून पावलं उचलण्यात आली आहेत.

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी आज मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंना भेटलो. ते रुग्णालयात होते. प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलो होते.

Today’s Rate
Sat19 Oct. 2024
Gold 24 KT 77,900 /-
Gold 22 KT 72,500 /-
Silver / Kg 95,500 /-
Platinum 44000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महाविकास आघाडीची प्रकृती सुद्धा ठीक आहे. महाविकास आघाडीत कुठलेही मतभेद नाहीत.

Advertisement

आम्ही एकत्र निवडणूक लढवणार आहोत. आज दुपारी 3 वाजता नाना पटोले आणि संजय राऊत जागावाटपावर चर्चा करतील, असे रमेश चेन्नीथला यांनी सांगितले.