वाडी(अंबाझरी): विद्यमान भाजपा सरकारच्या कार्यकाळात राज्यात,सरकारच्या विरोधात शेतकरी, शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी यांच्यात तिव्र असंतोष दिसत असून त्याचप्रमाणे आता सरकारला जास्त राजस्व कर मिळवून देणारा ट्रान्सपोर्ट व्यवसायी संचालक सुद्धा आपली हालत सुध्दा गंभीर असल्याचे दर्शविन्यासाठी त्यांच्या दीर्घ काळापासून प्रलंबित असणाऱ्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी व शासन-प्रशासना चे लक्ष केंद्रित व्हावे या दृष्टीने वाडी-वडधामना येथील सर्व ट्रान्सपोटर्स एकत्र येऊन न्याय मिळविण्याकरिता आंदोलन करण्याच्या तयारीला लागले आहेत, वाडी येथील ट्रान्स्पोर्ट्स फ्रेंड्स असोसिएशन चे अध्यक्ष सुनील पांडे,सचिव नरेंद्र कुमार मिश्रा आणि ट्रान्सपोर्ट नेता मानसिंग ठाकूर, किताबसिंग चौधरी,आर.आर.मिश्रा, दिनेश बारापत्रे यांनी वृत्त पत्राचे प्रतिनिधींना आपल्या व्यवसायात येणाऱ्या अडचणी बोलून दाखवून एका निवेदना द्वारे त्याची माहिती दिली.
जी.एस.टी, नोटबंदी नंतर अडकचणीत सापडलेल्या या ट्रान्सपोर्ट व्यवसाया कडे राज्य व केन्द्र शासनाने जानून बूजून दुर्लक्ष केल्यामुळे हा धंदा डबघाईस आला आहे असे त्यांचे म्हणणे आहे.सरकार आमच्या मागण्याकडे दूर्लक्ष करित आहे.त्यामुळे हया व्यापाऱ्यामध्ये तिव्र नाराजी वाढीस लागल्याचे दिसून येत आहे,वाडी वडधामना येथे व्यवसाय करणारे ट्रान्सपोर्ट मालक,चालक गेल्या कित्येक वर्षापासून मागणी करित आहेत की संपूर्ण राज्यातून या परिसरात ट्रकचे आवागमण असते त्यांच्या सोयीसाठी सुसज्ज पार्कींग प्लाझा असावा,तेथे आवश्यक सुविधा असाव्यात, मात्र वाडी, वडधाामन्यात पार्कींचीे व्यवस्था नसल्यामुळे कुठेही गाडी उभी करून आपले काम चालवून घ्यावे लागते. मात्र ट्राफीक पोलिस त्यांच्याकडून चालान फाडून दंड वसूल करतात. नाहीतर झॅमर लावून घेतात. यामुळे ट्रान्सपोर्ट व्यवसायी व पोलीस यांच्यात कित्येक वेळा संघर्ष निर्माण झाला. प्रथम पार्कींगची व्यवस्था करून द्यावी त्यानंतरच ट्रकवर कार्यवाही करावी अशी प्रमुख मागणी आहे. परंतू याच्याकडे कोणत्याही राजकीय पुढाऱ्याचे लक्ष नाही किंवा इच्छाशक्ती नाही असे म्हणण्यास काही वावगे नाही. या ठीकाणी खूप मोठया संख्येने ट्रकचालक ये जा करित असतात परंतू येथे सुलभ सौचालयाची व्यवस्था नाही.त्यामुळे त्यांना मलमूत्र विसर्जनासाठी कुठेही खुल्या जागेचा सहारा घेऊन आपले काम भागवून घ्यावे लागते. कित्येक वेळा नगर परिषद वाडी गोदरी मुक्त गांव या पथकाच्या कचाट्यात ट्रक ड्रायव्हर सापडले. मग या चालक व कन्डक्टर ने जावे तर कुठे जावे? आजच्या घडीला ट्रान्सपोर्ट व्यवसाय शासनाला फार मोठ्या प्रमाणात नगदी राजस्व कर,रोड टॅक्स भरते परंतू त्या मानाने समाधानकारक सोयी उपलब्ध करून दिल्या नाहीत,
आज महाराष्ट्र सिमेवर कर्मचारी,व पोलीस अवैध वसूली करून लूट करित आहेत.या सर्व अडचणीचा पाढा विद्यमान आमदार समीर मेघे,भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.राजीव पोतदार,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,सांसद कृपाल तुमाने यांना प्रत्यक्ष भेटून वाचून दाखविला व तसे निवेदन पण दिल्या गेले होते,सर्वांनीच त्यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले,परंतु २ वर्षाचा काळ लोटून गेला परंतू आजपर्यंत आमच्या समस्येवर कोणताही परिणामकारक विचार केला गेला नाही. त्यामुळे ट्रान्सपोर्ट संचालका मध्ये तीव्र असंतोष व शासना विरोधात तिव्र नाराजी निर्माण झाली आहे.वाडी- वडधामना परिसरात सर्व सामान्य जनतेला,तसेच एखादा अपघात झाला किंवा,ट्रक चालकाची अचानक प्रकृती बिघडली तर त्याला तुरंत औषध उपचार व्हावा याकरिता एक सरकारी रूग्नालय या परिसरात असावे अशीही मागणी त्यांनी केली आहे.अटलांटा कंपनी द्वारे राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू आहे, टोल घेणे कितीतरी दिवसापासून सुरु झाले अजून सर्विस रोड पूर्ण न झाल्याने मध्येच वाहणे रस्त्यावर उभे राहतात,ट्रॅफीक ला अडथळा होतो, पोलीस या कडे लक्ष देत नाही उलट ते हेल्मेट च्या चक्कर मध्ये सामान्य जनतेला वेठीस धरण्याच्या मागे लागलेले असतात.
यावेळी उपस्थित ट्रान्सपोर्ट मालक बब्लू सिंह,अखिलेश सिंग,महेंद्र जैन,योगेश चौबे,हरिशसिंह,प्रेमशंकर तिवारी, मोहन पाठक, अजय पांडे,विनोद ढोमकर,नमोद नगराळे, राकेश चिलोरे यांनीे चर्चेवेळी हा व्यवसाय समस्याने ग्रासला असल्याचे मनोगत व्यक्त केले.या आमच्या प्रलंबित मागण्या आणी अन्यायाच्या विरोधात एकत्र येऊन शासन, प्रशासन,राजकिय पुढारी यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी शनिवार दि,16 ला एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्याचे ठरविले आहे,सर्व ट्रान्स्पोर्टर,चालक,मालक यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे,