पारशिवनी: जीवोदय फाऊंडेशन पारशिवनी तर्फे दिव्यांगांना साहित्य वाटप कार्यक्रम गट साधन केंद्राच्या सभागृहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाराशिवनी पंचायत समिती चे गट विकास अधिकारी प्रदीप बमनोटे तर प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक गट विकास अधिकारी अनिल आकुलवार, गट शिक्षणाधिकारी कैलास लोखंडे, मानव एकता मंचचे संयोजक डॉ.इरफान, ज्येष्ठ पत्रकार गोपाल कडू, नगरसेविका अनिता भड, जीवोदय फाउंडेशनच्या अध्यक्षा सोनाली काकूनीया प्रामुख्याने उपस्थित होत्या.
याप्रसंगी सुषमा ढोंगे हिला कमोड चेअर, दर्शन खोडके ह्याला सायकल, गणेश लोंडे, सानिया भिवगडे, प्रिया लांजेवार यांना व्हील चेअर हे साहित्य मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जीवोदय फाऊंडेशनचे सचिव खुशाल कापसे यांनी, प्रास्ताविक स्नेहलता कोचर यांनी तर आभार प्रदर्शन गौरीशंकर ढबाले यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.माधुरी बावनकुळे, संतोष बोरकर,सिंधू चव्हाण, मंगला दुधबावणे , दिव्यांग समावेशीत शिक्षणाच्या सारिका जाधव,चंदा बेझलवार, ज्योती रघटाटे, प्रकाश राऊत, सुकृत खांडेकर यांनी परिश्रम घेतलेत.