नागपूर. आज सोमवारी दक्षिण नागपूर मध्ये प्रभाग क्रमांक 29 मौजा बिडी पेठ व प्रभाग क्रमांक 30 मौजा हरपुर येथे दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते, भारतीय जनता पार्टी दक्षिणचे अध्यक्ष देवेंद्र दस्तुरे, झोपडपट्टी मोर्चा शहराचे अध्यक्ष रमेश वानखेडे यांच्या हस्ते स्थानिक नागरिकांना झोपडपट्ट्यांच्या आखीव पत्रिकांचे वाटप करण्यात आले.
आखीव पत्रिका वाटप कार्यक्रमाचे आयोजन नगरसेविका स्नेहल बिहारे, रिता मुळे, नगरसेवक नागेश सहारे, झोपडपट्टी मोर्चा महानगर महामंत्री दीपक आवळे यांनी केले.
कार्यक्रमात उषा झांबरे, उपाध्यक्ष कैलास धोंगडे, संजय मोहतुरे, खातिजा बी अम्मा यांनी विशेष सहकार्य केले. भारतीय जनता पार्टीने झोपडपट्टी नागरिकांना दिलेला शब्द पूर्ण करून दाखवल्याबद्दल झोपडपट्टीवासीयांनी आभार व्यक्त केले. उर्वरित खाजगी जागेवरील मालकी पट्ट्याचा विषय लवकरच निकाली निघेल असे आश्वासनही यावेळी देण्यात आले.