Published On : Tue, Aug 30th, 2022
By Nagpur Today Nagpur News

पूर्व नागपुरातील दिव्यांग व ज्येष्ठांना सहाय्यक साधने वितरण १ सप्टेंबर रोजी

Advertisement

ना. नितीन गडकरी, ना.डॉ. वीरेंद्र कुमार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती

नागपूर : भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय द्वारे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांच्या सशक्तीकरणासाठी केंद्र सरकारच्या दिव्यांग सहायता योजना (अडीप – असिस्टंट टू डिसेबल पर्सन) आणि राष्ट्रीय वयोश्री योजना अंतर्गत दिव्यांग आणि ज्येष्ठांना सहाय्यक साधने वितरण करण्यात येत आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून नागपूर शहरातील विधानसभा क्षेत्रनिहाय साहित्य वितरणाचे शिबिर घेण्यात येत असून या अंतर्गत गुरूवारी १ सप्टेंबर २०२२ रोजी पूर्व नागपूरमधील लाभार्थ्यांकरिता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदरदार वल्लवभाई पटेल (कच्छीविसा) मैदान, ए.व्ही.श्री. लेआउट लकडगंज येथे गुरुवारी सकाळी १०.३० वाजता केंद्रीय मंत्री, सडक परिवहन व राजमार्ग मंत्रालय मा.श्री. नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री मा.डॉ. वीरेंद्र कुमार आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते साहित्य वितरित करण्यात येणार आहेत.

Gold Rate
Thursday 09 Jan. 2025
Gold 24 KT 78,700 /-
Gold 22 KT 73,200 /-
Silver / Kg 91,200 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर शहर व जिल्हातील जेष्ठ नागरिक व दिव्यांगाना अनुक्रमे केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय वयोश्री योजना- २०२१ आणि दिव्यांग सहायता योजना (अडीप – असिस्टंट टू डिसेबल पर्सन) या अंतर्गत भारतीय कृत्रिम अंगनिर्माण निगम ( ALIMCO- Artifical Limbs Manufacturing Corporation Of India), नागपूर महानगरपालिका आणि समेकित क्षेत्रीय कौशल्य विकास पुनर्वास एवं दिव्यांग जन सशक्तीकरण केंद्र (सी.आर.सी. नागपूर) च्या वतीने नागपूर शहरातील दिव्यांग आणि ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत सहायक साधने वितरित करण्यात येणार आहेत. काही दिवसांपूर्वी दक्षिण नागपुरातील ९०१८ लाभार्थ्यांना ९.१९ कोटी रुपये किंमतीची (अडीप – ८५४, वयोश्री- ८१६४) एकूण ६८,६८३ साहित्य, उपकरणे (अडीप- १७३१, वयोश्री- ६६९५२) वितरित करण्यात आली. १ सप्टेंबरला पूर्व नागपुरातील ४५४९ (अडीप – ५९०, वयोश्री- ३९५९) लाभार्थ्यांना एकूण ३४१३० (अडीप- १२०२, वयोश्री- ३२९२८) साहित्य, उपकरणे वितरित करण्यात येणार आहेत. या साहित्याची एकूण किंमत ४.८२ कोटी रुपये एवढी आहे.

केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय वयोश्री योजना- २०२१ आणि दिव्यांग सहायता योजना (अडीप असिस्टंट टू डिसेबल पर्सन) या अंतर्गत साहित्य वितरणासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे २७ फेब्रुवारी ते २० मार्च २०२२ या कालावधीत दहाही झोन अंतर्गत नोंदणी शिबिर घेण्यात आले होते. या शिबिरांच्या माध्यमातून नागपूर शहरातील 27,356 वरिष्ठ नागरिक वयोश्री योजनामध्ये तसेच 7780 दिव्यांगजन एडिप योजनामध्ये नोंदणी करण्यात आली आहे. एकूण 35136 लाभार्थ्यांना रु 34.83 कोटीचे उपकरण वितरित केले जाणार आहे.

पूर्व नागपुरातील लाभार्थ्यांना साहित्य वितरणाचा शुभारंभ गुरुवारी (१ सप्टेंबर) रेशीमबाग मैदानात सकाळी १०.३० वाजता केंद्रीय मंत्री, सडक परिवहन व राजमार्ग मंत्रालय मा.श्री. नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री मा.डॉ. वीरेंद्र कुमार आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल.

कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून आमदार सर्वश्री ना. गो. गाणार, प्रवीण दटके, अभिजीत वंजारी, चंद्रशेखर बावनकुळे, डॉ. नितीन राऊत, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन मते, विकास ठाकरे, भारतीय कृत्रिम अंगनिर्माण निगम (एलिम्को) कानपूरचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. राजन सेहगल उपस्थित राहतील. तर महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव श्री. मनु कुमार श्रीवास्तव, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी प्रसन्ना-बिदरी, पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, मनपा आयुक्त तथा प्रशासक आणि जिल्हाधिकारी श्री. विपीन इटणकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती श्री. मनोजकुमार सुर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त श्री. दीपककुमार मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. योगेश कुंभेजकर यांची प्रमुख उपस्थिती असेल.

कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, (एलिम्को), नागपूर महानगरपालिका, नागपूर जिल्हा प्रशासन आणि सीआरसी नागपूर यांनी केले आहे.

राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत देण्यात येणारी उपकरणे

वॉकिंग स्टिक

श्रवण यंत्र

एल्बो कक्रचेस

व्हीलचेअर

ट्रायपॉड्स

क्वॅडपॉड

कृत्रिम मर्डेचर्स

स्पेक्टल्स

क्वॅकपॉड

स्पेक्टल्स

एडीआयपी योजनेंतर्गत देण्यात येणारी उपकरणे

वॉकिंग स्टिक

एल्बो कक्रचेस

एझलरी कक्रचेस (कुबडे)

कृत्रिम अवयव

श्रवण यंत्र

ट्रायपॉड्स

क्वैडपोड

व्हीलचेयर

ट्रायसिकल (मॅन्युअल)

ट्रायसिकल (बॅटरी)

कॅलीपस

TLM कीट

ब्रेल कीट (दृष्टीहिन करीता)

स्मार्ट फोन (दृष्टीहिन करीता)

डेजी प्लेयर (दृष्टीहिन करीता)

स्मार्ट केन (दृष्टीहिन करीता)

Advertisement