Published On : Thu, Oct 26th, 2023
By Nagpur Today Nagpur News

वीज कर्मचा-यांकडून धम्म बांधवांना भोजन व पुस्तिका वितरण

Advertisement

नागपूर:- 67 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर येथील पवित्र दिक्षाभुमीला भेट देणा-या धम्म बांधवांकरिता भोजनदान, राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याची माहिती देणारे पुस्तक व महावितरणच्या विविध योजना व सुविधांच्या माहिती पत्रकाचे निशुल्क वाटप महाराष्ट्र राज्य वीज वितरण, पारेषण व निर्मिती कंपनी मर्यादीत भोजनदान समितीतर्फ़े करण्यात आले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथील दीक्षाभूमीवर आपल्या असंख्य अनुयायांना बौधा धर्माची दिक्षा दिली होती, या ऐतिहासिक दिनाच्या अनुषंगाने दरवर्षी विजयादशमीच्या दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षीच्या 67 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पवित्र दिक्षाभुमीवर आलेल्या संपूर्ण महाराष्ट्रातील धम्म अनुयायांना आपल्या गावी परत जाताना भोजनदान व राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याची माहिती देणारे पुस्तक तसेच महावितरणच्या योजना व सुविधा पत्रकाचे निशुल्क वितरण करण्यात आले.

Gold Rate
Friday 07March 2025
Gold 24 KT 86,300 /-
Gold 22 KT 80,300 /-
Silver / Kg 97,700 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या कार्यक्रमाचे उद्घाटन महावितरण नागपूरचे प्रादेशिक संचालक श्री सुहास रंगारी यांचे हस्ते आणि नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता श्री अजय खोब्रागडे, श्री राजेश नाईक, आणि कार्यकारी अभियंता हेमराज ढोके, यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. आपल्या उद्घाटनपर भाषणात प्रादेशिक संचालक रंगारी सुहास रंगारी यांनी बाबासाहेबांच्या तेंव्हाच्या धम्मदीक्षा कार्यक्रमाबाबत माहिती देऊन सर्वांनी समानता व सदाचरण याबाबत जागरूकता बाळगावी व जनतेने याठिकाणी होणाऱ्या भोजनदानासोबतच मोफत पुस्तक वितरणाच्या माध्यमातून आपली ज्ञानाची भुक भागवावी आणि समाजाला आणखी शिक्षीत बनवून बाबासाहेबांच्या कार्याला पुढे नेण्याचे आवाहन केले तर मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी महावितरण कडुन सामान्य जनतेसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत त्यामध्ये ऑनलाईन वीजबिल भरणा व गो ग्रीन मधुन बील भरल्यास दहा रुपयांची सुट, सोलर योजने अंतर्गत वीजनिर्मिती व वापराची मुभा तसेच शेतकऱ्यांना मदत याबाबत मार्गदर्शन केले तसेच पुढील वर्षी महावितरण लोकाभिमुख प्रसाराचे दृष्टीने दिक्षाभुमीवर भोजनदानासोबतच दोन दिवस माहितीकक्ष सुरु करण्यासाठी भोजनदान व पुस्तक वितरण समितीने पुढाकार घ्यावा असे सुचवले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धोंगडे यांनी, प्रस्ताविक मधुकर सुरवाडे यांनी तर आभार प्रदर्शन भैय्याजी रेवतकर यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समिती सदस्य सहाय्यक अभियंता कुणाल पाटील,राजेंद्र पाटील, प्रफुल मेश्राम, भीमराव सोमकुवर, रणजीत पानतावणे, बादल गोस्वामी, अमोल मेंढे, दिलीप आवळे, मनोज मेश्राम, अनिल टेंभुर्णे, नरेंद्र तिजारे, प्रशांत नानोरे, संतोष हिरुळकर, सचिन राऊत, महेंद्र पाचघरे, पुरुषोत्तम मानकर, राजेंद्र चरपे, सुमित रेवतकर, प्रमोद मेश्राम, राजेंद्र पाटील, अविनाश अंबादे, एच.ए.पाटील, विजय गायकवाड, राहुल लांजेवार, अमरदीप बागडे, अतुल कोटांगळे, सुरज गजभीये, प्रशांत मेश्राम, उदल राठोड, मनीष कुंभारे, आशिष जुवार, मनोज भेंडे, रवि दुरुगकर व नागपूर,भंडारा, देवरी व गोंदिया च्या कर्मचा-यांनी अथक परिश्रम घेतले.

Advertisement