कॉलेज काळातील जुने मित्रांनी एकत्रित येऊन केली गरजूंना मदत
नागपूर: “मदर्स डे” हा दिवस विशेषतः मातृत्वाला वंदन करण्याचा दिवस मानला जातो. सद्या कोरोनाच्या पर्शवभूमीवर देशात लोकडाउन चालू आहे. या लॉकडाउनचा फटका विशेषतः रोजनदारीने कमावणारे व खाणारे लोकांवर बसला आहे.
त्याअनुषंगाने खऱ्या अर्थाने “मदर्स डे” साजरा करण्यासाठी कॉलेज काळातील जुने मित्र मैत्रिण यांनी गरजू नागरिकांना अन्न धान्य किटचे वाटप करून साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला व समर्पण वेल्फेयर फाउंडेशनच्या पुढाकाराने उत्तर नागपूर क्षेत्रातील ५० गोरगरीब व गरजू कुटुंबांना किटचे वितरण करण्यात आले.
या किटमध्ये तांदूळ, गहू, मीठ, तेल, चणाडाळ, तूरडाळ, मिर्ची पावडर, मसाला पावडर, हळदी पावडर, बेसन, साखर, चायपत्ती व डेटॉल साबण या वस्तूंचा समावेश होतो.
सदर उपक्रम राबविण्याकरीत मिलिंद बोदेले, पवन भुते, आदेश डेकाटे, श्रीकांत नायर, सुशांत खोब्रागडे,आरजु गोंडाने, सोनम हरडे, ऐश्वर्या नागपूरे, रुचिका रामटेके, दीपा सूर, पल्लवी गायकवाड, सुकेशनि वाघमारे, पूनम चवरे यांनी विशेष सहकार्य केले. तसेच, समर्पण वेल्फेयर फाउंडेशनच्या संदीप शेंडे, राकेश मेश्राम, सचिन तिरपुडे, सुरज कांबळे, संकेश रामराजे, निलेश मेश्राम, स्नेहा रामराजे व मयुरी कांबळे यांनी किट तयार करून वितरित करण्यासाठी परिश्रम घेतले.