कन्हान : – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती व अन्नसुरक्षा दिवसा निमित्य कन्हान येथील अंत्यत गरजु कुटुंबीयांना मदतीचा एक हात म्हणुन अन्नधान्य, तेल व जिवनाश्यक वस्तुच्या किटचे वाटप करण्यात आले.
गुरूवार (दि.३०) एप्रिल ला श्री. विजय हटवार माजी सदस्य भारतीय खा द्य निगम, उपभोगता सल्लागार समिती, खादय व सार्वजनिक वितरण मंत्रालय भारत सरकार आणि सामाजीक कार्यक र्ता प्रशांत बाजीराव मसार यांच्या व्दारे कन्हान येथील अत्यंत गरजु ३३ कुंटुबा च्या घरची परिस्थिती पाहुन त्यांना अन्न धान्य, तेल जिवनाश्यक वस्तु किटचे वाटप करण्यात आले. या गरजुंनी श्री. विजयजी हटवार व प्रशांत मसार यांचे मनापासुन आभार व्यकत केले.
यावेळी कुंदन रामगुंडे, रोशन खंगारे, विनोद येलमुले, दिपक तिवाडे, क्रिष्णा गांवडे, बंटी हेटे, प्रकाश तिमांडे, भोला भोयर, प्रदिप नाटकर, आनंद भुरे, रामु कावळे प्रामुख्याने उपस्थित होते.