कामठी :-सर्वत्र थैमान घातलेल्या कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव नोयंत्रणात आणण्यासाठी कामठी तालुक्यात 23 मार्च पासून टाळेबंदी सह जमावबंदी कायदा लागू करण्यात आला आहे यानुसार कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी तालुका प्रशासन जीवाची पर्वा न करता कर्तव्यदक्ष भूमिका बजावत आहे तेव्हा या प्रशासनिक पोलीस अधिकारी व कर्मचारी, आरोग्य अधिकारी व कर्मचारी, महसूल प्रशासनिक अधिकारी व कर्मचारी तसेच इतर अधीकारी कर्मचाऱ्यांना कोरोनावर मात करता यावे यासाठी लॉकडाऊनच्या काळात जीवाची बाजी लावून कोरोनाग्रस्तावर उपचारासाठी व कोरोनाला रोखण्यासाठी व रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी एक सामाजिक दायित्व म्हणून माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आमदार टेकचंद सावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय उपजिल्हा रुग्णालय कामठी चे सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ महेश ह महाजन यांनी आज होमिओपॅथीकच्या गोळ्या मोफत वितरण केल्या
यानुसार आज तहसील कार्यालयात नायब तहसीलदार आर एच दुसावार, पोलीस स्टेशन ला सहाय्यक पोलीस आयुक्त राजरतंन बन्सोड, जुनी कामठी पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक देविदास कठाळे,नवीन कामठी पोलीस स्टेशन पोलिस निरीक्षक संतोष बाकल, पोलीस निरीक्षक आर आर पाल यासह इतर अधिकारी कर्मचाऱ्यांना होमोईओपॅथिक औषध आर्सेनिक अल्बम 30 (कोरोना प्रतिबंधक /इम्युनिटी बूस्टर) औषधी चे वितरण करण्यात आले कोरोनासंदर्भात सर्व नियमाचे काटेकोरपणे पालन करून औषधी चे वितरण करण्यात आले याप्रसंगीं भाजपाचे अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा अध्यक्ष मनोज चवरे व शहर अध्यक्ष संजय कनोजिया,कार्याध्यक्ष राजेश खंडेलवाल, महामंत्री उज्वल रायबोले, सुनील खानवानी, अल्पसंख्याक अध्यक्ष वसी हैदरी,अजय पांचोली, प्रमोद वर्णम , सतीश जैस्वाल, आदी उपस्थित होते.
संदीप कांबळे कामठी