नागपूर, : राज्याचे महसूलमंत्री तथा नागपूर-अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने कामठी विधानसभा क्षेत्रातील तब्बल 18 हजार नोंदणीकृत इमारत बांधकाम कामगारांना गृहपयोगी साहित्य संच वाटप करण्यात आले आहे.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्गत 1 ते 17 एप्रिल दरम्यान नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी गृहपयोगी वस्तू संच वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पाच ठिकाणी चाललेल्या या शिबिरांत 6 एप्रिल पर्यंत तब्बल 18 हजार 69 कामगारांनी लाभ घेतला आहे. शिबिराच्या शेवटी 17 तारखेपर्यंत हा आकडा 50 हजारावर जाण्याचा अंदाज आहे.
वडोदा-गुमथळा जिल्हा परिषद क्षेत्रात माँ भवानी माता मंदिर परिसर, बिडगाव नगर पंचायत क्षेत्रात देशमुख सभागृह, कोराडी जिल्हा परिषद व महादूला नगर पंचायत क्षेत्रासाठी श्री क्षेत्र देवस्थान विठ्ठल रखुमाई देवस्थान, बहादुरा-खरबी-कापसी-विहिरगाव जिल्हा परिषद क्षेत्रात ईस्ट पॉइंट स्कूल आणि हुडकेश्वर-नरसाळा-बेसा-पीपळा हा क्षेत्रात सह्याद्री स्कूल अँड कॉन्व्हेंट या ठिकाणी या शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.
ज्या इमारत बांधकाम कामगारांनी नोंदणी केली असेल अशाच कामगारांना गृहपयोगी साहित्य संच देण्यात आले. 17 प्रकारच्या अशा एकूण 30 गृहपयोगी वस्तूंचा यात समावेश आहे. या शिबिराच्या माध्यमातून मिळालेल्या या आवश्यक गृहपयोगी वस्तुंमुळे कामगारांनी समाधान व्यक्त केले असून महसूलमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले आहे.
आजपासून पुढे 17 एप्रिल पर्यंत खात-कोदामेंढी जिल्हा परिषद क्षेत्रात सूर संगम देवस्थान समोर धर्मापुरी येथे, मौदा शहर-तारसा-बाबदेव-धानला-चिरव्हा जिल्हा परिषद क्षेत्रासाठी राधाकृष्ण सभागृह, मौदा येथे, कामठी शहर नगर परिषद क्षेत्रात जुने नगर परिषद, कामठी येथे आणि भिलगाव-रानाळा जिल्हा परिषद व येरखेडा नगर पंचायत क्षेत्रात पंकज मंगल कार्यालय, रनाळा या ठिकाणी हे शिबिर चालणार आहे.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी यशस्वीतेसाठी पालकमंत्री श्री. बावनकुळे यांच्या कार्यालयातील कर्मचारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते अथक परिश्रम घेत आहेत.