कामठी :-अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वितरण कोरोना लॉकडाऊनमुळे अनुसुचित जमातीच्या कुटुंबांसमोर बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचे संकट होते. त्यामुळे उदभवलेल्या कोरोना विषाणूच्या पाश्वरभूमीवर शासनाने अनुसूचित जमातीच्या भूमिहीन मजूर ,विधवा महिला, अपंग व्यक्ति असलेले, अनाथ मुलांचे संगोपन करणारे कुटुंब व घटस्फोटित महिला अशा आदिवासी लाभार्थ्यानाआघाडी सरकारने खावटी अनुदान योजनेंतर्गत अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचे अनुदान स्वरुपात वाटप करण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार कढोली ग्रामपंचायतीच्या वतीने कापसी ग्रा प सभागृहात खावटी वाटपाचा कार्यक्रम पार पडला.
महाराष्ट्र शासनाच्या विभागातर्फे प्रत्येकी दोन हजार रुपये किमतीचे किराणा साहित्य व 2 हजार रुपये रोख (लाभार्थ्यांच्या बँक खात्यात) असे एकुण 4 हजार रुपये अनुदान स्वरूपात देण्यात आले.
राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाकडून खावटी अनुदान योजनेच्या माध्यमातून कापसी येथे अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या किट वाटप करण्यात आले.
आदिवासीच्या सर्वांगीण विकासासाठी आदिवासी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांचा लाभ आदिवासी बांधवानी घेऊन आपला विकास साधावा, महाराष्ट्र सरकारची खावटी वाटप योजना 2017 पासून बंद होती. परंतु कोरोना परिस्थिती लक्षात घेता ही योजना शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत पुन्हा सुरू करण्यात आली. सदर योजना ही आदिवासींसाठी असुन अत्यंत गरीब, पारधी,अपंग निराधार, विधवा, भूमिहीन, परित्यक्ता अशा आदिवासी समाज बांधवांकरीता राबविण्यात येत असल्याचे मनोगत कढोली ग्रा प सरपंच प्रांजल वाघ यांनी व्यक्त केले.याप्रसंगी कापसी ग्रा प सरपंच श्यामराव आडोळे, राजेश वाघ आणि लाभार्थी उपस्थित होते.