कन्हान : – शिवसेना पक्षप्रमुख मा. उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्त्याने युवासेना राम टेक विधानसभा व्दारे धर्मराज विघालय कांद्री-कन्हान येथे विद्यार्थ्याना वृक्ष वाटप करण्यात आले.
बुधवार (दि.३) ऑगस्ट ला युवासेना रामटेक विधानसभा चिटणीस लोकेश बावनकर यांच्या व्दारे पक्षप्रमुख मा उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिव साच्या निमित्याने धर्मराज विद्यालय कांद्री-कन्हान येथे मुख्याध्यापक श्री. रमेश साखरकर सर, प्राथमिक चे मुख्याध्यापक श्री. खिमेश बढिये सर, उपमुख्याध्यापि का सौ. तिळगुळे मॅडम, पर्यवेक्षक श्री.सुरेंद्र मेश्राम सर , पर्यावरण प्रमुख श्री. अनिल सारवे सर, युवासेना जि ल्हा समन्वयक श्री. लखनजी यादव, समाजसेवक श्री. गजराज देविया सर, कन्हान शहर प्रमुख श्री. समीर मेश्राम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वृक्ष वाटप करून आप ल्या घरी किंवा परिसरात वृक्ष लावुन त्यास जगविण्या चा संकल्प घेण्यात आला.
\
आयोजक युवासेना रामटे क चिटणीस लोकेश बावनकर हयांनी विद्यालयाचे व उपस्थित सर्वांचे आभार व्यकत केले. याप्रसंगी विद्या लयातील शिक्षक हरिष केवटे सर, सुनील लाङेकर सर , विजय पारधी सर, ङाखोळे सर, अनिल मंगर सर, गोन्नाडे सर, गेडाम सर, हरिष पोटभरे सर, उदय भस्मे सर आदी शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर वृंदा सह विद्यार्थी बहु संख्येने उपस्थित होते.