Published On : Wed, Jan 3rd, 2024
By Nagpur Today Nagpur News

जिल्हा बँक घोटाळा;सुनील केदारांच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला नोटीस; पुढील सुनावणी 9 जानेवारीला

Advertisement

नागपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला नोटीस बजावली आहे.

या नोटीसच्या माध्यमातून येत्या 6 जानेवारीपर्यंत राज्य सरकारला या प्रकरणी उत्तर सादर करायचे आहे. त्यानंतर या जामीन अर्जावर पुढील सुनावणी येत्या 9 जानेवारीला होईल.

Advertisement
Today's Rate
Wed 18 Dec. 2024
Gold 24 KT 76,900/-
Gold 22 KT 71,500/-
Silver / Kg 89,900/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

काँग्रेस नेते सुनील केदार यांना 22 डिसेंबर रोजी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने विविध गुन्ह्यांतर्गत दोषी ठरवून कमाल पाच वर्षे सश्रम कारावास आणि एकूण 12 लाख 50 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली होती. सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यावर केदार यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर आज उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यावर सुनावणी घेत वरील आदेश दिले आहेत.

Advertisement