Published On : Thu, Oct 10th, 2019

नवमतदारांच्या संख्येत आठ हजाराने वाढ -जिल्हाधिकारी

Advertisement

नागपूर : मतदारांच्या संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमानंतर मतदार संख्येत नवीन 8 हजार 53 मतदाराची भर पडली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक ग्रामीण मोनिका राऊत, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा, नोडल अधिकारी एमसीएमसी अनिल गडेकर उपस्थित होते.

Advertisement
Wenesday Rate
Wed 25 Dec. 2024
Gold 24 KT 76,300/-
Gold 22 KT 71,100/-
Silver / Kg 88,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे 20 उमेदवार दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून आहेत. तर सावनेर व पूर्व नागपूरातून अनुक्रमे 8 उमेदवार आहेत. विधानसभा मतदानासाठी 41 लाख 71 हजार 420 मतदानासाठी हक्क बजावतील. जिल्ह्यात 2670 सर्व्हीस वोटर आहेत. तर ट्रान्सजेंडर्सची मतदारांची संख्या 99 एवढी आहे. 4412 मतदान केंद्र असून त्यापैकी 30 ही सहायक मतदान केंद्र असतील. निवडणुकांसाठी जिल्ह्यात 21 हजार 900 पेालीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीतर्फे चार उमेदवारांचे 11 जाहिरातीचे प्रमाणीकरण करण्यात आले आहे. भारत निवडणूक आयोगातर्फे जिल्ह्यात निवडणुकीसाठी 6 सर्वसाधारण निरीक्षक तर 4 खर्च विषयक निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहे.

प्रशासनाने अरूंधती पानतावणे यांचा युथ आयकॉन म्हणून नवमतदारांमध्ये जागृती करण्यासाठी नुकताच

महानगरपालीकेमध्ये मतदार संवाद कार्यक्रम घेण्यात आला. स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जागृतीचे उपक्रम करण्यात येत असुन माध्यमांनी मतदारांना मतदान करण्यासाठी किंबहुना स्वत:चे मूलभूत कर्तव्य बजावण्यासाठी प्रेरीत करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले

Advertisement