Advertisement
नागपूर: नागपूर महानगर बॉडी बिल्डींग असोसीएशनतर्फे बॉडी बिल्डिंग जिल्हा स्तरीय स्पर्धा थाटात पार पडली. स्पर्धेचे आयोजन राकेश देविदास ढंगे आणि रेखा देविदास ढगे यांनी रविवारी ३ मार्चला मेडीकल चौक, राजाबाक्षा मंदिर मैदानात केले होते.या स्पर्धेत १०० स्पर्धकांनी भाग घेतला.
यादरम्यान प्रमुख पाहुणे- (डी.वाय. एसपी, भंडारा) डॉ. अशोक बागुल, मा. श्री. अनिल तांकसांडे साहेब (वरीष्ठ पोलिस निरीक्षक सक्करदारा पो.स्टे., नागपूर) व इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली.
नागपूर श्री चॅमपियन २०२४ चा किताब विक्रांत गोडबोले यांनी पटकला.विक्रांत गोडबोले हे नागपूर पोलीस विभागात कार्यरत आहेत. मागील 12 वर्षापासून ते पोलीस विभागात नौकरी करत असून अनेक बाडी बिल्डींग स्पर्धेत सहभाग घेत त्यांनी मेडल प्राप्त केले आहेत.