नागपूर. नेहरूनगर झोन अंतर्गत प्रभाग २६मधील पडोळे नगर झोपडपट्टी वाठोडा रोड येथे प्रस्तावित सिवर लाईन व सी.सी पेव्हिंगच्या कामाचे रविवारी (४ ऑक्टोबर) पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या हस्ते भूमीपूजन झाले.
पडोळे नगर झोपडपट्टी वाठोडा रोड येथील सरदार यादव यांचे घरापासून ते जांभूळकर यांचे घरांपर्यंत सिवर लाईन आणि सी.सी. पेव्हिंगचे काम प्रस्तावित होते. या कामाच्या पूर्तीसाठी प्रभागाचे नगरसेवक मनपाचे विधी समिती सभापती तथा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी प्रयत्न केले. ॲड.धर्मपाल मेश्राम यांच्या प्रयत्नातून सदर १२ लाखाच्या कामाचे ४ ऑक्टोबर रोजी भूमिपूजन करण्यात आले.
भूमिपूजन समारंभ प्रसंगी नेहरूनगर झोनच्या सभापती समिता चकोले, नगरसेवक जितेंद्र (बंटी) कुकडे, भाजपा प्रभाग अध्यक्ष सर्वश्री राजेश संगेवार, सुरेश बारई, अशोक देशमुख, प्रशांत मानापूरे, प्रवीण बोबडे आदी उपस्थित होते.