Advertisement
कामठी: दिवाळी सनाच्या निमित्ताने हा पर्व सामूहिक रित्या साजरा करण्याच्या दृष्टिकोनातून कामठी नगर परिषद कार्यालयात मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या मुख्य उपस्थितीत नगराध्यक्ष मो शाहजहा शफाअत यांच्या शुभ हस्ते देवि लक्ष्मी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण तसेच दीपप्रज्वलन करून पूजा करीत दिवाळी साजरी करून एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी उपमुख्य अधिकारी नोतीन चव्हाण, नगर परिषद उपाध्यक्ष शाहिदा बेगम अन्सारी, नगरसेवक लालसिंग यादव, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे पदाधिकारी नौशाद सिद्दीकी, उज्वल रायबोले, नगर परिषद स्वास्थ्य निरीक्षक विजय उर्फ गफ्फु मेथीयां,माधुरी घोडेस्वार, शेवंती हाडोती, पूजा राऊत, अश्वविनी पिल्लारे,सारिका परदेसी, चंद्रकला गडपायले, गायत्री गडपायले, सुनीता सोनभद्रे आदी उपस्थित होते.
संदीप कांबळे कामठी