Published On : Sat, Oct 21st, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात दिवाळीत ट्रॅव्हल्सकडून होणारी लूट थांबवण्यासाठी एसटीकडून विशेष नियोजन

Advertisement

नागपूर: दिवाळीनिमित्ताने गावी जाण्यासाठी नागरिक प्रवास करतात. यादरम्यान प्रवाशांकडून खासगी ट्रॅव्हल्स चालक दुप्पट-तिप्पट तिकीटदर घेत आहेत. हा लूटमारीचा प्रकार थांबवण्यासाठी एसटीने नागपूर-पुणे आणि इतरही मार्गासाठी विशेष नियोजन केले आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची नागपूर विभागातर्फे ७ नोव्हेंबर २०२३ ते ११ नोव्हेंबर २०२३ पर्यंत नागपूर पुणे नागपूर (शिवशाही आसनी व साधारण आसनी) या मार्गावर नियमित फेऱ्यांव्यतिरिक्त जादा वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नागपूर-पुणे या मार्गावर गणेशपेठ बसस्थानकावरून जादा शिवशाही आसनी, साधी बसेस १५ नोव्हेंबरपासून दुपारी या नियमित वेळेच्या व्यतिरिक्त संध्याकाळी ५ आणि ७ वाजता जादा बसेस पुणेसाठी सोडल्या जातील.

Today’s Rate
Thu17 Oct. 2024
Gold 24 KT 76,900 /-
Gold 22 KT 71,500 /-
Silver / Kg 91,700 /-
Platinum 44000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

प्रवाशांची संख्या वाढल्यास जादा बसेसची व्यवस्था करण्यात येईल. तसेच नागपूर-माहुर, सावनेर-माहुर, नागपूर-वाशिम, नागपूर-गोंदिया, सावनेर- गोंदिया, उमरेड-अमरावती आणि इतरही भागांत जादा वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे.

Advertisement