नागपूर: जोपर्यंत सरकार कर्जमाफी देत नाही तोपर्यंत राज्यातील जनतेने सरकाशी असहकार पुकारावा. सरकारचे कुठलेही देणे देवू नये असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील जनतेला केले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मी विनंती करतो की,राज्य चालवण्याचे काम तुमचं आहे परंतु धमकी,धाकधपटशा दाखवून एखादयाला तुरुंगात टाकायचे.सामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला उलथवून टाकण्याची ताकद या बळीराजामध्ये आहे असे जबरदस्त आव्हानही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी लाखोंच्या संख्येने जमलेल्या जनसमुदायासमोर दिले.
नागपूरच्या मॉरीस कॉलेज टी पॉईंट येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस,शेकाप,आरपीआय(कवाडे),सपा,माकप यांच्या संयुक्त हल्लाबोल-जनआक्रोश सभा पार पडली. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार,काँग्रेस पक्षाचे नेते गुलामनबी आझाद, काँग्रेसचे प्रभारी मोहनप्रकाश, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे,काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान, माजी उपमुख्यंमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, शेकापचे नेते जयंत पाटील, आरपीआयचे नेते जोगेंद्र कवाडे, डॉ. राजेंद्र गवई, माकपचे नेते कॉम्रेड गावित, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील,काँग्रेस पक्षाचे नेते माणिकराव ठाकरे, सपाचे खासदार आणि नेते अबु आझमी, आदींसह सर्व पक्षाचे नेते, माजी मंत्री, आमदार, खासदार, माजी खासदार, उपस्थित होते.
या सभेमध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील,विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे,सपाचे नेते खासदार अबु आझमी,राजेंद्र गवई, शेकपाचे नेते जयंत पाटील आदींची भाषणे झाली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी आज शरद पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त निर्धार करुया की,या सरकारला पदच्युत करुन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय गप्प बसणार नाही असे सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.खोटारडया सरकारच्या विरोधातील हा जनसमुदाय कसा संताप व्यक्त करतोय हे आम्ही आमच्या हल्लाबोल आंदोलनातुन दाखवून दिले आहे आणि त्यामुळे आता सरकारला जाग आली आहे.
यावेळी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही आपले विचार व्यक्त केले.काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांनीही सरकारवर टिका केली.
राष्ट्रवादी काँग्रेल पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी दोन्ही पक्षांना सत्ता बळीराजाच्या भल्यासाठी आवश्यक असून सरकारच्याविरोधात एकमेकांच्या सहकार्याने एकत्रित आलो तर २०१९ मध्ये अशक्य असे काहीच नसणार असे सांगतानाच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधील पक्षाची स्थिती सांगितली. गुजरातमध्ये सरकारच्या पायाखालची जागा सरकू लागली आहे.त्यामुळे त्यांची झोप उडाली असल्याचेही प्रफुल्ल पटेल म्हणाले.
या सभेमध्ये काँग्रेस नेते गुलामनबी आझाद यांनी हिंदीतून भाषण केले.त्यांनी केद्रामध्ये आणि राज्यात भाजपची सत्ता आहे.परंतु हे सरकार फक्त खोटी आश्वासने देत आहे म्हणूनच हल्लाबोल आणि जनआक्रोश आंदोलन केले जात आहे.देशाचा पंतप्रधान शेतकऱ्यांशी खोटं बोलत असून तो देशातील शेतकऱ्यांचा अपमान आहेच शिवाय हा देशाचाही अपमान असल्याचे गुलामनबी आझाद म्हणाले.
सभेमध्ये यवतमाळ ते नागपूर अशी १५६ किलोमीटरची हल्लाबोल पदयात्रा काढणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा काँग्रेस नेते गुलामनबी आझाद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर शरद पवार यांचा वाढदिवस असल्याने त्यांना पुष्पगुच्छ देवून अभिष्टचिंतन करण्यात आले.
न भुतो न भविष्यती असा लाखोंचा हल्लाबोल मोर्चा आज विधानभवनावर धडकला. त्यानंतर भव्य सभा पार पडली.