मुंबई -सरकारने सगेसोयरेबाबत जी अधिसूचना काढली मात्र त्याची अंमलबजावणी केली नाही. विशेष अधिवेशन घेऊन सरकारने काय केले? असा सवाल उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी विचारला. जर तुम्ही सगेसोयरेबाबतची अंमलबजावणी करून मराठा आरक्षण दिले असते तर १५ दिवस तुमच्या अंगावरचा गुलाल निघाला निसता, असे म्हणत जरांगे यांनी आंदोलनाची पुढील दिशा सांगितला. तसेच, २४ फेब्रुवारीपासून आंदोलन करण्याचा इशाराही मनोज जरांगे पाटलांनी दिला.
‘सगेसोयरे’ अध्यादेशाची अंमलबजावणी होईपर्यंत निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी मनोज जरांगे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. तसेच, आयोगाने निवडणूक घेतली तर प्रचाराची गाडी ताब्यात घ्या, असे आवाहनही त्यांनी मराठा बांधवांना केले आहे.
दरम्यान २४ फेब्रुवारीपासून आम्ही रास्ता रोको आंदोलन करणार असून एकाही नेत्याने आमच्या घरापर्यंत येऊ नये , असेही ते म्हणाले.