नागपूर : डॉ. सुनील राव यांच्या एसबीआय कॉलनी, राज नगर येथील निवास्थानी विहीर साफ करताना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी डॉक्टर राव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
माहितीनुसार , शंकर उईके आणि अमन मरकम हे दोन मजूर डॉ. सुनील राव यांच्या निवास्थानी विहीर साफ करून त्यातील गाळ काढण्याचे काम करत होते. मजूर विहिरीच्या आत काम करत असताना कोणीतरी मोटार चालू केली आणि त्यामुळे विजेचा धक्का बसून दोन्ही मजुराचा मृत्यू झाला. मजुरांच्या मृत्यूला डॉ. सुनील राव यांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.