Published On : Fri, Dec 1st, 2023

डॉक्टर ही देशाची संपत्ती,आरोग्य सेवा लोकांच्या आवाक्यात असणे गरजेचे : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Advertisement

नागपूर : मध्य भारतातील गरीब नागरिकांचे विश्वासार्ह, खात्रीलायक, किफायतशीर उपचाराचे केंद्र असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (GMC Nagpur) ७५ वा अमृत महोत्सव आज महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत थाटात पार पडला. यावेळी आपल्या भाषणाने राष्ट्रपती मुर्मू आरोग्य सेवांवर प्रकाश टाकला.

डॉक्टर ही देशाची संपत्ती आहे. आरोग्य सेवा लोकांच्या आवाक्यात असणे गरजेचे आहे . गरजू रुग्णांना औषध स्वस्त पुरवण्यात यावी.तसेच रुग्णांना सुलभ सेवा उपलब्ध करून देणे हे आपले कर्तव्य असल्याचेही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.
या कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस उपस्थित होते.

Advertisement

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना नागरिकांसाठी फायदेशीर ठरत असल्याचेही त्या म्हणाल्या.आपल्या देशात अवयवदात्यांचा तुटवडा आहे, वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना याबाबत जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही मुर्मू यांनी केले.

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवीन तंत्रज्ञानामुळे वैद्यकीय व्यवस्थेला नवी दिशा मिळेल, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उत्तम वैद्यकीय व्यवस्था लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 2047 पूर्वी भारताला पूर्ण विकसित आणि शक्तिशाली राष्ट्र बनवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे,असेही मुर्मू म्हणाल्या.