नागपूर— नागपूर जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर यांच्या दंडेलशाहीला समाज कल्याण आयुक्तांनी लगाम लावण्याची मागणी करत समाज कल्याण नागपूर प्रादेशिक कार्यालयासमोर डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंचाच्या कार्यकर्त्यानी किशोर भोयर यांच्या प्रतिमेला चिल्लर पैशाने आभिषेक घातला डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंचाचे संस्थापक अध्यक्ष डॉ जितेंद्र ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले
या वेळी नागपूर जिल्ह्यात ठराविक दिव्यांग शाळातील पन्नास कर्मचाऱ्यांना 2018 पासून एक रुपया वेतन समाज कल्याण ने दिले नाही उलट संस्थेला बिनबोभाट लाखोरुपये परिपोषण देण्याचं काम किशोर भोयर व वैसक लांडे यांनी करून येथील कर्मचाऱ्यांवर सामाजिक अन्याय केला आसा आरोप डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी केला न्याय मागितला म्हणून रातोरात शाळा बंद करण्याची धमकी समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर यांनी दिली या आधि याच आधिकार्यानी कधी तपासणी केली का आसा सवाल उपस्थित करत हुडकेश्वर मधील संतगाडगेबाबा मूकबधिर विध्यालयाला विध्यार्थी व कर्मचारी यांची आधारबेस उपस्थिती न बघताच करोडो रुपये वितरत केले ,
123 मधील एकही शाळेत कर्मचारी विध्यार्थी आधारबेस उपस्थिती नसताना समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर आधिकार खुटीला बांधतात तर सावनेर व खापरखेडा येथील शाळेवेळी किशोर भोयर, वैसका लांडे याचे आधिकार जागे होतात का असा सवाल करत प्रादेशिक उपायुक्त यांनी या बाबतीत येत्या 48 तासात भूमिका घेऊन कर्मचाऱ्यांना न्याय ध्यावा व दंडेलशाही करणारे समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर ला बडतर्फ करावै नसता समाज कल्याण आयुक्त. दिव्यांग आयुक्त याना घेराव घालून जाब विचारला जाईल असा इशारा डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंचाचे अध्यक्ष डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी दिला या वेळी अनेक अन्याय ग्रस्त कर्मचारी व कार्यकर्ते उपस्थित होते