मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्व राजकीय पक्ष वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करत आहेत. यातच शिवसेना ठाकरे गटाच्या एका जाहिरातीवर भाजपाने आक्षेप घेत हल्लाबोल केला. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी यासंदर्भात भाष्य करत ठाकरे गटावर निशाणा साधला.शिवसेना ठाकरे गटाला महाराष्ट्रात पॉप, पार्टी आणि पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
चित्रा वाघ यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद ठाकरे यांना धारेवर धरले. आदूबाळ नाईट लाईफ प्रायव्हेट लिमिटेडच्या जाहिरातीमध्ये दाखवण्यात आलेलं एक पात्र हा एक पॉर्न स्टार आहे. आणि तोच या जाहिरातीमध्ये विचारतो की महिलांवरचे अत्याचार कधी थांबणार? आणि हाच इसम लहान वयाच्या मुलींसोबत अश्लील चित्रीकरण करतो.
या जाहिरातीत वडिलांच्या भूमिकेत जो व्यक्ती आहे, त्याचे ‘उल्लू’ ॲपवरील एका वेबसीरिजमध्ये नको ते कृत्य करतानाचे व्हिडीओ, क्लिप्स आहेत. अशा माणसाला घेऊन त्यांनी ( ठाकरे गटाने) महिला अत्याचारावरची जाहिरात कशी केली?असा संतप्त सवाल ठाकरे गटाने उपस्थित केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये ते कसली संस्कृती आणायचा प्रयत्न करत आहेत? असा प्रश्न वाघ यांनी उपस्थित केला.
या जाहिरातीमधील कलाकारामुळे महाराष्ट्रातील महिलांची मान शरमेने झुकली आहे. ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये पॉर्न स्टारचा समावेश आहे. आदूबाळने याआधीच नाईट लाईफसाठी आग्रह धरला होता. आता, त्यांना पॉप, पार्टी आणि पॉर्नची संस्कृती रुजवायची आहे का? एक पॉर्न स्टार उबाठाच्या जाहिरातीमध्ये झळकतो. त्यांना जाहिरातीसाठी इतर कलाकार मिळाला नाही का? अशा सवालाची सरबत्ती वाघ यांनी केली.