– ४ ते ६ अगस्तपर्यंत जमाअत ए इस्लामी हिंदचा उपक्रम
जमाअत ए इस्लामी हिंद महाराष्ट्रच्या वतीने ‘डोनेट प्लाज्मा डिफिट कोरोना’ या तीन दिवसीय राज्यव्यापी मोहिमेची सुरुवात ४ अगस्त पासून करण्यात येणार आहे. चार ते सहा अगस्तपर्यंत नागपूरसह राज्यात सर्वत्र ही मोहिम राबविण्यात येणार असल्याचे जमाअत ए इस्लामी हिंदचे नागपूर शहर अध्यक्ष डॉ. अनवार सिद्दिकी यांनी सांगितले.
जगभरातील वैज्ञानिक कोरोनाची लस शोधण्यात गुंतले असतांना सध्यातरी कोरोना रुग्णांकरिता ‘प्लाज्मा थेरेपी’ आशेचा एक किरण आहे. कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीच्या प्लाज्मामध्ये कोरोना विषाणूला प्रभावहिन करणारी प्रतिपिंडे तयार होतात. शतकापूर्वी आलेली स्पॅनीश फ्लू महामारी, इबोला व सार्समध्ये देखील प्लाज्मा थेरेपीचाच वापर करण्यात आला. देशात लाखों व्यक्तींना कोरोनाची लागन झाली असली तरी यातून बरे होणा-यांचे प्रमाणदेखीत मोठे आहे.
इस्लाममध्ये इतरांना मदत करण्याला सर्वात मोठे स्थान आहे. हीच बाब लक्षात घेऊन या तीन दिवसीय राज्यस्तरीय मोहिमेत कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींना प्लाज्मा दान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे.