बेला: जवळच्या पवनी येथील आराध्या विकास व बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने झेंडावंदन घेऊन भोजन दान करण्यात आले.
संस्थेतर्फे पवनी येथील शीतल म्हैसकर यांच्या शेतात अनाथ व वृद्धाश्रम नियोजित करण्यात आले आहेत. तेथील पटांगणात झेंडा रोवून गणराज्य दिनाचा सोहळा साजरा करण्यात आला. प्रस्तावित संस्थेमार्फत निराधार, निराश्रित वृद्ध व अनाथ मुला मुलींचे पालन पोषण व संगोपन केल्या जाणार आहे असे सूत्रांनी कळवले.
भोजन दानाचे यशस्वीतेसाठी अध्यक्ष आकाश बहादुरे, विना म्हैसकर अमित भागवते विलास काळसर्पे सोनू वाघमारे भारत चौरे गजानन गलांडे ,भारत मसराम विजय धोटे, बाबा गोलू चहांदे, गोलू मून ,पुंडलिक भोयर ,रमेश गेडाम ,विजय गलांडे ,बाबा गोडघाटे, यामिनी पाटील, दत्ता भोसकर पूजा पाटील भारत सातपुते गौतम गोडघाटे दुर्वे, सेवक गोडघाटे ,विठ्ठल नारायणे ,सिद्धू मून, भीमराव मून ,प्रतीक कांबळे ,दादा मून, शालिक काळबांडे ,संदेश गोडघाटे इत्यादी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.