राज्यसभेत कर्करोग या विषयावरील अल्पकालीन चर्चेत खासदार पद्मश्री पुरस्कृत डॉ. विकास महात्मे यांनी भाग घेतला. त्यांनी सांगितले कि कर्करोगाबद्दल जनमानसातील भीती घालविण्यासाठी प्रचार व प्रसार मोहीम राबवणे गरजेचे आहे. कॅन्सर झाला हे ऐकूनच रुग्ण अर्धमेला होतो. पण आधुनिक वैद्यक शास्त्राने केलेल्या प्रगती मुळे कॅन्सर उपचाराने बरा होऊ शकतो;
विशेषतः सुरवातीच्या टप्प्यात निदान झाले तर कॅन्सर वर उपाय आहेत. काही कॅन्सर जसे कि महिलांमधील गर्भाशयाच्या तोंडाचा (Cervix) कर्करोग लसीकरणा द्वारे टाळता येऊ शकतो; तसेच त्याचे निदान आणि कॅन्सर होण्याची शक्यताही तपासणी द्वारे लवकर लक्ष्यात येऊ शकते. स्तनाच्या कर्करोगाचे निदानMammography द्वारे रोग होण्याआधीच केल्या जाऊ शकते; तसेच पुरुषांमधील प्रोस्टेट कॅन्सर चे निदान ही वेळोवेळी PSA तपासणी च्या माध्यमातून ओळखता येऊ शकतो.
आयुष्यमान भारत अथवा मोदी केअर योजने अंतर्गत यापैकी महत्वाच्या तपासण्या जिल्हा पातळीवर उपलब्ध केल्या गेल्या आहेत. तसेच जेनेरिक औषधी द्वारा कॅन्सर वरील महागड्या औषधांच्या किंमती मध्येही लक्षणीय घट विद्यमान सरकारने केली आहे. मात्र यासंबंधी माहिती जनमानसात पोहचविण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
कॅन्सर सारख्या रोगांवर शास्त्रोक्त पद्धतीनेच उपचार होणे गरजेचे आहे असेही त्यांनी सांगितले. बरेचदा जवळचे नातेवाईक, मित्र स्वतःचे अनुभव सांगून, अमुक एका औषधाने अथवा जडी बुटी ने कसा फायदा झाला असे सांगून त्याच अकुशल डॉक्टर अथवा वैदू अथवा भोंदू बाबा कडे जाण्यास सांगतात.
लोकांनी अश्या गोष्टींस अथवा अंधश्रद्धांना बळी पडू नये असे आवाहन त्यांनी केले. “मला आलेला अनुभव म्हणजे वैज्ञानिक पुरावा नाही” हे लक्ष्यात घ्यायला हवे असेही त्यांनी आवर्जून सांगितले. आणि असे विवेकनिष्ठ विचार लहानपणापासूनच विकसित करण्याच्या दृष्टीने शिक्षणात भावनिक नियमन व जीवन कौशल्याचा समावेश असण्याची गरज आहे असे प्रतिपादन केले.