कामठी:-सर्वत्र थैमान घातलेल्या कोरोना विषाणू प्रदूर्भावाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूचे प्रमाण वाढलेले दिसून आले त्यातच सद्याच्या स्थितीत नागरिकांनी घेतलेली सतर्कतेची जवाबदारी व प्रशासनाने केलेल्या कर्तव्यदक्ष भूमिकेतून कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाला असला तरी धोका अजूनही टळला नाही, आरोग्य विभागाने सुचविल्यानुसार तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नसून ही तिसरी लाट लहान बालकांसाठी घातक आहे
तेव्हा आतापासूनच कंबर कसने गरजेचे आहे , प्रशासनाने दिलेल्या त्रिसूत्री निर्देशांचे पूर्णपणे पालन केल्यास कोरोनावर नक्कीच नियंत्रण मिळविता येईल तेव्हा नागरिकानो कोरोना कमी झाला म्हणून गाफील राहू नका, सावधानता बाळगा, प्रशास्नानाने निर्देशित केलेल्या त्रिसूत्री सूचनांचे पूर्णपणे पालन करा असे आव्हान खासदार कृपाल तुमाणे यांनीं आज कामठी तहसील कार्यालयात आयोजित कोरोना आढावा बैठकीत व्यक्त केले.दरम्यान त्यांनी कोरोना परिस्थितीचा प्रशासकीय आढावा घेतला.ज्यामध्ये तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात लागणारे अतिआवश्यक औषधोपचार, औषधीसाठा ऑक्सिजन पुरवठा आदींचा आढावा घेतला तसेच कोरोना नोयंत्रणासाठी प्रशासन कुठेही कमी पडणार नाही याची दक्षता घेण्याचेआव्हान सुद्धा केले.
याप्रसंगी उपविभागीय अधिकारी श्याम मदनूरकर, तहसीलदार अरविंद हिंगे, नायब तहसीलदार उके, नायब तहसीलदार दुसावार , तालुका आरोग्य अधिकारी डॉ माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय मालचे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल शिरे, मुख्याधिकारी संदीप बोरकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
संदीप कांबळे कामठी