Published On : Tue, Jan 2nd, 2024
By Nagpur Today Nagpur News

अफवावर विश्वास ठेवू नका, नागपूर जिल्ह्यात मुबलक पेट्रोल व गॅस साठा; जिल्ह्याधिकाऱ्यांची माहिती

नागपूर :देशात लागू झालेल्या नवीन ‘हिट अँड रन’ कायद्याच्या विरोधात वाहतूकदार आणि ट्रकचालक संपावर गेले आहेत.तेल टँकर चालकांनी आंदोलनात सहभागी होण्याची घोषणा करताच.नागपुरात पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणाऱ्यांची गर्दी पाहायला मिळाली . यापार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नागपूरकरांना अफवावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन केले.

जिल्ह्यात कालपासून ट्रक चालकांनी काही ठिकाणी रस्तारोको आंदोलन केल्यामुळे इंधन टंचाईची अफवा पसरली आहे. शहरात पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात ग्राहकांच्या रांगा लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज पेट्रोल व गॅस पुरवठा करणाऱ्या सर्व प्रमुख कंपन्या, पेट्रोल डिझेल व गॅस डिलर असोशिएशनचे नागपूर जिल्ह्याचे प्रतिनिधींची सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे उपस्थित होते.

Gold Rate
Thursday 06 Feb. 2025
Gold 24 KT 84,900 /-
Gold 22 KT 79,000 /-
Silver / Kg 96,000 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या बैठकीमध्ये पेट्रोल डिझल व गॅस डिलर असोशिएशनने नमूद केले की, सदर संपाला आमचा पाठिंबा नाही. स्वतःच्या टँकरने पुरवठा करण्याची त्यांनी तयारी दर्शवली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीमधूनच जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्याशी चर्चा करून टँकर धारकांना पोलीस संरक्षणाची हमी दिली. याशिवाय नागपूर पोलीस आयुक्तांशी देखील त्यांनी परिस्थितीबाबत चर्चा केली.

Advertisement