Published On : Fri, Jan 12th, 2018

हुंड्याने घेतला विवाहितेचा बळी

Advertisement

Dowry Suicide
नागपूर: नवीन कामठी ठाण्याअंतर्गत नेरी परिसरात राहणाºया पूनम राहुल वंजारी (२०) या विवाहितेने बुधवारी सकाळला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या आत्महत्या प्रकरणाला तपासामध्ये वेगळे वळण मिळाले. हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून वारंवार होणाºया जाचाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात उघड झाले. याप्रकरणी तिच्या पतीसह सासरे व सासु अश्या चार जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिस सुत्रांनुसार, आरोपींमध्ये पूनमचे पती राहुल वंजारी (२५), सासरे नारायण वंजारी (६०), सासू निरुपा वंजारी व दिर संकेत वंजारी यांचा समावेश आहे. पूनमचे माहेर हे भामेवाडा असून त्याच गावात राहुलची बहिणीचे सासर आहे. त्यामुळे गावात येणे जाणे राहुलचे नेहमी असायचे. त्यातच राहुल आणि पूनमची भेट झाली आणि ते प्रेमाच्या बंधनात अडकले. यानंतर त्या दोघांनी घरच्यांना लग्न करण्यासाठी विनंती केली. मात्र, घरचे तयार नसल्याने त्यांनी त्या दोघांनी १ आॅगस्ट २०१७ ला प्रेमविवाह केला. लग्नानंतर राहुल नेरी येथे राहणाºयास आला. यानंतर त्याच्या घरच्यांनी त्या दोघांना घरी समावून घेतले. परंतु, चांगल्या घरची असलेल्या पूनमला वारंवार सासरची मंडळी माहेरुन पैसे आणण्याची मागणी करू लागले. यामुळे पूनम व राहुलमध्ये दररोज भांडण व्हायचे. वाद विकोपाला गेल्यानंतर राहुल अनेकदा तिला मारहाणही करायचा. छाळाला कंटाळून पूनम आपल्या माहेरच्या याबाबत सांगायची. मात्र, पूनमच्या घरच्यांची परिस्थिती नसल्याने हा त्रास ति सहन करायची. परंतु, तिच्या सारसच्या मंडळींनी हुंड्याची मागणी लावून धरली. यामुळे ती मानसिकरित्या कंटाळल्या गेली.

अखेर कंटाळून पूनमने बुधवारी सकाळी सातच्या दरम्यान राहत्याघरी गळफास लावून आत्महत्या केली. यानंतर नवीन कामठी पोलिसांनी सुरुवातील अकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंदवित पुढील तपास सुरु केला असता तपासात सासरच्या मंडळींनी छळ केल्याचे उघडकीस आले. पूनमचे वडिल रामकृष्ण मनिराम साखरकर (रा. भामेवाडा, कुही) यांनी दिलेल्या तक्रारीवरून नवीन कामठी पोलिसांनी आरोपींविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरु आहे.

Gold Rate
22 April 2025
Gold 24 KT 99,400 /-
Gold 22 KT 92,400 /-
Silver / Kg 97,000 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement