नागपुर– नागपुरातील यशवंत स्टेडीयमवर ‘डॉ बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारक’ बनविण्यासाठी 31 डिसेंबर 1990 ला मनपा द्वारे एकमताने प्रस्ताव पास करण्यात आला.
परंतु 30 वर्षे झालेत दरम्यान काँग्रेस-एनसीपी, भाजप-सेना यांची सरकारे येऊन गेली, परंतु यशवंत स्टेडियमवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारक बनू नये या मताचे हे दोन्ही सरकारी असल्यामुळे आजपर्यंत बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारक यशवंत स्टेडियमवर बनू शकले नाही.
हे स्मारक बनावे यासाठी विविध आंबेडकरी संघटना, संस्था व राजकीय पक्षांनी निवेदने दिली, धरणे दिली, निदर्शने केली, मोर्चे आणि आंदोलने सुद्धा केली परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या विरोधातील ही सरकारे असल्यामुळे जाणून या सरकारांनी हे स्मारक बनू दिले नाही, बनविले नाही किंवा त्यासाठी स्टेडियममधील खुली जागा मनपाच्या स्वाधीन सुद्धा केली नाही.
काल 19 जुलै ला नागपुरातले दोन नितीन एकत्र आले त्यातले एक नितीन नागपूरचे पालकमंत्री आहेत आणि दुसरे नितीन नागपूरचे खासदार आहेत हे दोन्ही नितीन एकत्र बसून यांनी यशवंत स्टेडियम च्या जागेवर बिझनेस सेंटर उभारण्याचे षड्यंत्र रचले आहे.
विभागीय आयुक्तांना त्याचं प्लॅनिंग बनवण्याचे दिशानिर्देश सुद्धा दिलेत यावरून यशवंत स्टेडियम वर बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांचे स्मारक बनू नये हे षड्यंत्र काँग्रेस आणि भाजपने पक्के केले असे लक्षात येते.
बहुजन समाज पार्टीने यापूर्वी अनेकदा धरणे, निदर्शने केलीत, निवेदने दिलीत, मोर्चे सुद्धा काढलीत आणि बसपाच्या नगरसेवकांच्या माध्यमातून या विषयावर अनेक चर्चा सुद्धा घडवून आल्यात.
बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे विरोधक असलेले भाजपचे नितीन आणि काँग्रेसचे नितीन या दोघांनी मिळून एक षडयंत्र रचले आहे. ते नागपुरातील नव्हे तर महाराष्ट्रातील फुले-शाहू-आंबेडकरी जनतेने हाणून पाडावे, असे यानिमित्ताने आवाहन करन्यात येत आहे.