नागपूर :भाजपने आजपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान बदलण्याचा प्रयत्न कधीच केला नाही. संविधान होते, म्हणून चहा विकणारा देशाचा पंतप्रधान झाला. जेव्हा मोदींनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे घेतली तेव्हा भारताच्या संविधानासमोर हात जोडून ते स्वीकारले. संविधानातील मूळ गाभा बदलण्याचा अधिकार संसदेला नाही हे सुप्रीम कोर्टानेही सांगितले आहे
.काँग्रेसकडे विश्वासार्हता नाही, कुठलेही विकासाचा मुद्दा नाही.त्यामुळे लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सातत्याने करण्यात येत असल्याचे टीकास्त्र देवेंद्र फडणवीस यांनी केले.
अग्निवीर योजना रद्द करणे म्हणजे देशाला धोक्यात टाकणं आहे. देशातील सैन्य युवा असले पाहिजे, जे इतर देशात आहे.आज देशात मोठ्या प्रमाणात अग्निवीर भरती झालेले आहेत आणि ते देशाच्या सीमेवर लोकांचे रक्षण करत आहेत असे फडणवीसांनी सांगितले.
मोदी सरकारने २०१९ ला प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात ७५ आश्वासने दिली होती ती सर्व पूर्ण करण्यात आली आहेत.भाजपाचे संकल्पपत्र हे कागदी नसून ती मोदींची गॅरंटी आहे. यावर जनतेचा विश्वास असून पुन्हा एकदा तिसऱ्यांदा महाराष्ट्रात आणि देशात मोदी सरकार सत्तेत येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.