रामटेक : विद्यासागर कला महाविद्यालय खैरी बिजेवाडा रामटेक येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रा. डॉ. गिरीश सपाटे व प्रा. रवींद्र पानतावणे यांचे हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.
सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख डॉ. सावन धर्मपुरीवार यांनी प्रास्ताविकातून डॉ. बाबासाहेबांचे जीवनचरित्र थोडक्यात उलगडून दाखविले. डॉ. गिरीश सपाटे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून डॉ. बाबासाहेबांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय विचारांचा आढावा घेऊन यांचे विचार हे मानवतेच्या प्रस्थापनेसाठी किती महत्वाचे होते हे समजावून सांगितले.
या प्रसंगी प्रा. अनिल दाणी, प्रा. रवींद्र पानतावणे, डॉ. सतीश महल्ले,डॉ. आशिष ठाणेकर, जितेंद्र बडनाग, संजय डोंगरे, ज्ञानेश्वर हटवार, विनोद परतेती उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रा. रवींद्र पानतावणे यांनी केले.