Published On : Fri, May 10th, 2024
By Nagpur Today Nagpur News

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी आरोपी अंदुरे, कळसकरला जन्मठेप तर इतर तिघे निर्दोष !

Advertisement

पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणी तब्बल ११ वर्षानंतर पुण्यातील विशेष न्यायालयाने निकाल जाहीर केला आहे. या प्रकरणात एकूण पाच आरोप होते. त्यापैकी सचिन अंदूरे, शरद कळसकर यांना दोषी मानून विशेष न्यायाधीश यांनी जन्मठेप सुनावली आहे. तसेच पाच लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. तर इतर तीन आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

दाभोलकर प्रकरणाचा निकाल देताना न्यायालय म्हणाले, कोणाचाही खून होणे ही दुर्देवी घटना आहे. साक्षीदाराची उलट तपासणी घेताना आरोपीच्या वकिलांकडून खुनाचा समर्थन करण्याची वक्तव्य करण्यात आली ती दुर्देवी आहेत. त्यावर त्यांनी विचार करावा असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.
२० ऑगस्ट २०१३ रोजी डॉ. दाभोलकर मॉर्निंग वॉकला गेले असताना त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेने अवघे राज्य हादरले.

Advertisement
Wenesday Rate
Wednesday01 Jan. 2025
Gold 24 KT 76,900 /-
Gold 22 KT 71,500 /-
Silver / Kg 86,700 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दाभोलकरांच्या खुनानंतर तब्बल आठ वर्षांनी हा खून खटला सुरू होण्यास मुहूर्त लागला. खुनाचा तपास पूर्ण होऊन पुण्यातील विशेष न्यायालयाने ५ आरोपींविरोधात आरोप निश्चित केले आणि खटल्यास सुरुवात झाली. जवळपास अडीच वर्षांपासून हा खटला चालू होता. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून झाला होता. सुरुवातीच्या काळात पुणे पोलिस या खुनाचा तपास करीत होते. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशावरून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला.

१५ सप्टेंबर २०२१ रोजी डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांवर आरोप निश्चित करण्यात आले. तावडे, अंदुरे, कळसकर आणि भावे यांच्यावर भारतीय दंडसंहिता (आयपीसी) कलम ३०२ (हत्या), १२० (बी) (गुन्ह्याचा कट रचणे), ३४ नुसार आणि शस्त्र अधिनियम संबंधित कलमांतर्गत आणि यूएपीए अंतर्गत गुन्हे दाखल आहेत.आज याप्रकरणी न्यायालयाने आरोपींना शिक्षा सुनावली आहे.

Advertisement