कन्हान : कन्हान येथून जवळच असलेल्या कोयला खदान जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी करण्यात आली.
उत्कृष्ट शिक्षणतज्ञ असल्यामुळे त्याचा जन्म दिवस शिक्षक दिन म्हणून संपूर्ण देशात उत्साहात साजरा केला जातो.तसेच यादिवसी अध्यापन कार्यात नानाविध उपक्रमांचा उपयोग करून विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करणा-या शिक्षकांचा प्रशासनामार्फत तसेच सेवाभावी संस्थांमार्फत सत्कार केला जातो.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी चंदनखेडे व उपक्रमशिल शिक्षक प्रेमचंद राठोड यांनी डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी देशासाठी केलेल्या कार्याला उजाळा दिला.सदर कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक अभिषेक कांडलकर, मधुमती नायडू, रिदवाना शेख,सारिका वरठी व मोठ्या प्रमाणात शाळेचे विद्यार्थी उपस्थिती होते.कार्यक्रमानंतर आशिष चव्हाण, आलिया खान,प्रिती भारद्वाज, नाजिया खान,सबा खान ह्या विद्यार्थ्यांनी शिक्षक बणून वर्गातील विद्यार्थ्यांना अध्यापनाचे धडे दिले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या सर्वच शिक्षक वृदांनी व विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.