नेहरू युवा केंद्र संघटनेच्या राष्ट्रीय एकात्मता शिबिराची नागपुरात सुरुवात
नागपूर: नेहरू युवा केंद्र संघटन विविध उपक्रमात भाग घेणार्या युवकांना नवीन ओळख आणि उर्जा देते. यामुळे त्यांना भारतीयत्वाबद्दल अभिमान वाटतो, असे मत राज्यसभेचे खासदार डॉ. विकास महात्मे यांनी आज नागपूर येथे व्यक्त केले. नागपूरच्या खडगाव रोड स्थित मिशन इंडिया कॅम्पसमध्ये आज ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ अभियानांतर्गत राष्ट्रीय एकात्मता शिबिराचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
केंद्रीय क्रीडा आणि युवा मंत्रालयाच्या स्वायत्त संस्था असणा-या नेहरू युवा केंद्र संघटनच्या (एनवायकेएस) नागपूरातील नेहरु युवा केंद्राद्वारे ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या संकल्पने अंतर्गत राष्ट्रीय एकात्मता शिबिराचे आयोजन 21 ते 25 फेब्रुवारी दरम्यान नागपूरच्या खडगाव रोड येथील मिशन इंडिया कॅम्पसमध्ये करण्यात आले आहे .
पाच दिवसीय राष्ट्रीय एकात्मता शिबिरात सुमारे 14 राज्यांतील सुमारे 300 तरुण एकत्र येऊन आपल्या सांस्कृतिक प्रतिभेचे प्रदर्शन करणार आहेत. यामध्ये आसाम, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश, दक्षिण-गोवा, ओडिशा, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, झारखंड, छत्तीसगड, दिव-दमण आणि महाराष्ट्र यांचा समावेश आहे. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेच्या माध्यमातून भारताच्या विविधतेतील एकता दर्शविण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या पाच दिवसांच्या शिबिराची रूपरेषा नेहरू युवा केंद्र नागपूरचे जिल्हा युवा समन्वयक उदयबीर यांनी दिली. मिशन इंडिया, नागपूरचे संचालक डॉ. रेगी लुकास म्हणाले की, “आम्हाला एक जीवन मिळाले आहे आणि त्यापासून आपण उत्तमोत्तम प्रयत्न केले पाहिजेत तसेच आपण विकास, समाज आणि देशासाठी कसे योगदान देऊ शकतो हे बघितले पाहिजे.
नेहरू युवा केंद्र संघटना, महाराष्ट्र आणि गोवाचे उपसंचालक शरद साळुंखे, श्री. हितेंद्र वैद्य, जिल्हा युवा समन्वयक, नेहरू युवा केंद्र, भंडारा; उदयवीर सिंह, जिल्हा युवा समन्वयक, नेहरू युवा केंद्र, जिल्हा युवा समन्वयक, नेहरू युवा केंद्र, नागपूर, स्नेहल बासुतकर, जिल्हा युवा समन्वयक, नेहरू युवा केंद्र अमरावती, शिवधन शर्मा, जिल्हा युवा समन्वयक, नेहरू युवा केंद्र, वर्धा, श्रुती डोंगरे, जिल्हा युवा समन्वयक, नेहरू युवा केंद्र, गोंदिया उपस्थित होते नेहरू युवा केंद्र भंडारा जिल्हा युवा समन्वयक श्री हितेंद्र वैद्य यांनी उद्घाटकीत सत्रात आभार प्रदर्शन केले.