Published On : Tue, Apr 25th, 2023
By Nagpur Today Nagpur News

डॉ. बिस्वजित मुखर्जी आंतरराष्ट्रीय आयकॉनिक पुरस्काराने सन्मानित

नागपूर : मुखर्जी ग्रुपचे संचालक डॉ. बिस्वजित मुखर्जी यांना आंतरराष्ट्रीय आयकॉनिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ही नागपूरकरांसाठी अभिमानाची बाबा आहे. मुखर्जी यांनी 2019 मध्ये CMS ED मध्ये वैद्यकीय पदवी पूर्ण केली.

गेल्या पाच वर्षांपासून मुखर्जी ग्रुप औद्योगिक क्षेत्रात सक्रिय आहे. ही कंपनी नागपुरातील बुटीबोरीमध्ये 1 वर्षापासून कार्यरत असून कंपनी फ्लॅट स्कीम आणि लेआउटवर काम करते.

इतकेच नाही तर गरजू लोकांना घरे देण्याचे कामही कंपनीच्या माध्यमातून करण्यात येते. मुखर्जी ग्रुपने निर्माण केलेल्या फ्लॅट स्कीममध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी चिल्ड्रेन प्ले एरिया असून क्लब हाऊस जिम-योगा मिडिटेशनचीही व्यवस्था करण्यात आली आहे. लिफ्ट 24/7 सिक्युरिटी गार्ड , पर्याप्त पार्किंग सुविधा, गार्डन आणि निसर्गरम्य वातावरण आपल्याला पाहायला मिळेल.