कन्हान : – प्राथमिक आरोग्य केंद्र साटक, ग्राम पंचायत साटक, आकाशझेप फाऊंडेशन रामटेक व अपोलो क्लासेस साटक यांच्या संयुक्त विद्यमाने साटक येथे महा रक्तदान व नि:शुल्क रोगनिदान शिबीर संपन्न झाले.सोमवार (दि.२४) ला प्रा.आ.केंद्र साटक येथे निशुल्क महा रक्तदान व रोगनिदान शिबिराचे उदघाटन मा. प्रदीप कुमार बम्हनोटे गटविकास अधिकारी पंचायत समिती पारशिवनी यांच्या हस्ते व , सौ सिमाताई उकुंडे सरपंच यांच्या अध्यक्षेत, डॉ.वैशाली हिंगे वैद्यकीय अधिकारी प्रा.आ.केंद्र साटक ,श्री. गजानन वाढरे उपसरपंच साटक आणि ग्राम पंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत करण्यात आले. डॉ वैशाली हिंगे यांनी प्रास्तविकातुन रक्तदान, देहदान, अवयवदान, रक्तगट तपासणी यांचे महत्त्व विषद केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री रमाकांत मुरमुरे सर यांनी केले . शिबिरात एनसीडी कॅम्प अंतर्गत २१२ लोकांना लाभ देऊन निशुल्क औषधोपचार करण्यात आला. शासकीय मेयो रुग्णालय रक्तपेढीकडे ३६ लोकांनी रक्तदान केले.९० लोकांची नेत्र तपासणी करण्यात आली. रक्तगट तपासणी, सिकलसेल तपासणी तसेच देहदान व अवयवदान संकल्प नोंदणी करण्यात आली.
शिबीरास मेयो रक्तपेढी, सिटी हॉस्पिटल,कॉन्टॅकेअर हॉस्पिटल नागपूर यांच्या चमुनी विशेष सहकार्य केले. शिबीरांच्या यशस्वीते करिता संशोधन कडबे, यशवंतराव उकुंडे, तरुण बर्वे, अजय हिंगणकर, रवि गुडधे, सचिन बालपांडे, राजु वाडीभस्मे, राजु श्रावणकर, मंगेश भुते, मंगेश हिंगे, सुरेंद्र मोहनकर, दिपक मोहनकर, नकुल वाडीभस्मे आणि प्राथ. आरोग्य केंद्र साटक चे बोदे, सोनटक्के, डोणारकर, मंगेश खोडे, डोईफोडे, मुंडले, पंचभाई, जितू लच्छोरे, सचिन मानकर व श्रीमती देशमुख, गाडगे, रोडे, चव्हाण,झाडे सिस्टर व आशा सेविका यांचे सहकार्य लाभले.