ठिकठिकाणी पोलिसांची करडी नजर।
रामटेक: धार्मिक विधी,दशक्रिया,देवदर्शनासाठी सदैव माणसांनी गजबजलेल्या तीर्थक्षेत्र अंबाळा येथे प्रचंड शांतता पसरली असून कोरोनापासून बचावासाठी प्रशासनाने पुढील आदेशापर्यत सर्व धार्मिक विधी बंद केलेल्या आहेत.तशा स्वरूपाचे होर्डिंग नगरपालिका प्रशासनाने लावलेले असून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.दररोज मोठ्या प्रमाणावर दशक्रिया व अन्य धार्मिक विधीसाठी ठिकठिकानाहून येणाऱ्या नागरिकाना यात्रेकरूंना परत पाठवीले जात आहे.सतत गजबजलेल्या धर्माशाळा व अंबाळा तलावाच्या दुरुस्तीचेही पूर्ण काम सुरक्षेच्या दृष्टीने बंद करण्यात आले आहे.
मोक्षधाम अंबाळा येथे अंत्यविधीसाठीही मोजकीच माणसे जात असून पोलिसांनी सर्व लोकांनी तोंडावर मास्क ,रुमाल किंवा दुपट्टा गुंडाळल्यावरच आत सोडले नाही तर परत पाठविल्याचे दृश्य पाहण्यात आले.एरव्ही गजबजलेल्या अंबाळा तलावाचा परिसर निरव शांत शांत झाला रामटेक नगरीत ठिकठिकाणी आणि खेडेगावतही पोलीस पथक होमगार्डसहित गस्त घालत असून तासनतास अखंडपणे कार्यरत आहेत.
विनाकारण कोणी जर रस्त्यावर आले तर त्यांना परिस्थितीच गांभीर्य पोलीस मंडळी समजावून सांगत आहेत. बाहेर पडलेल्याना मास्क,दुपट्टा बांधण्याचा व स्वतःसोबत इतरांचीही काळजी घेण्यासाठी प्रयत्न करावे असे सांगत आहेत.
विनाकारण कोणत्याही परिस्थितीत गर्दी होणार नाही याकडे पोलिसांचे विशेष लक्ष आहे.कोरोनामुळे तयार झालेल्या कठीण परिस्थितीत नागरिकांनी प्रशासनाकडून मिळालेली माहिती व सूचनांचे गांभीर्याने काटेकोरपणे पालन करून प्रशासन व पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी केले आहे.