बहराईच: उत्तर प्रदेशच्या बहराईच जिल्ह्यातील लक्खा बौंडी गावाच्या जवळ घागरा नदीमध्ये एक नाव उलटून 6 जणांचा मृत्यू झाला. यात 9 जण स्वार होते. पैकी तिघांनी पोहून आपला जीव वाचवला. हे सर्व जण नदी पार करून मटेरिया मेला पाहण्यासाठी गेले होते. माहिती मिळताच अधिकारी घटनास्थळी पोहोचले. हा अपघात शनिवारी सकाळी 5 वाजता झाला. सर्व जण घाघरा नदी पार करून मटेरिया यात्रेत फिरण्यासाठी आले होते. रात्र झाल्याने सर्व जण तिथेच थांबले होते. शनिवारी सकाळी नावेवर स्वार होऊन परत घरी जात होते. त्याच वेळी अचानक नदीत त्यांची नाव उलटली.
मृतांमध्ये 2 मुलेही सामील
स्थानिक प्रशासनाने पाणबुड्यांच्या मदतीने 2 मुलांसह 6 जणांचे मृतदेह हस्तगत केले आहेत. नावेतील 3 जणांनी पोहून आपला जीव वाचवला.