Published On : Wed, Aug 23rd, 2023
By Nagpur Today Nagpur News

दिल्ली-नागपूरसाठी लवकरच धावणार दुरांतो एक्सप्रेस !

Advertisement

नागपूर : यशवंतपूर- दिल्ली सराय रोहिला दुरांतो एक्स्प्रेसला नागपुरातही थांबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्ली-नागपूरसाठी लवकरच दुरांतो एक्सप्रेस धावणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नागपूर आणि दिल्ली दरम्यान एकही थांबा नाही. हे लक्षात घेता बहुतांश गाड्या नागपूर मार्गे धावतात. तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, जीटी, राजधानी एक्सप्रेस आदी गाड्या येथून जातात. आता आणखी एक गाडी मिळणार आहे.

Gold Rate
Tuesday 25 March 2025
Gold 24 KT 87,900 /-
Gold 22 KT 81,700 /-
Silver / Kg 98,200 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

त्यानुसार, आता २६ ऑगस्टपासून सुटणारी गाडी क्रमांक १२२१३ यशवंतपूर – दिल्ली सराय रोहिला दुरंतो एक्स्प्रेस दुपारी ४:१५ वाजता नागपूर स्थानकावर पोहोचेल. त्यानंतर ५ मिनिटांच्या थांब्यानंतर ४:२० वाजता दिल्लीकडे रवाना होईल. दिल्लीहून येणारी गाडी क्रमांक १२२१४ दुपारी १:२५ ला नागपूर स्थानकात येईल आणि १:३० वाजता यशवंतपूरकडे रवाना होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

Advertisement
Advertisement