नागपूर: गेल्या १५ जून २०२३ पासून नागपूर -मुंबई – नागपूर दुरांतो एक्स्प्रेसच्या डब्यांमध्ये रेल्वे प्रशासनाकडून बदल करण्यात आले होते.या कारणास्तव केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे डबे पूर्वपदावर आणण्यासाठी श्री नागपूरचे शहराध्यक्ष प्रवीण दटके व आमदार विकास कुंभारे यांच्यासह प्रवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वेमंत्र्यांना निवेदन दिले. आज यासंदर्भात एक परिपत्रक जारी करून रेल्वे बोर्डाने 6 स्लीपर कोच आणि 11 असे 3 टायर कोच ठेवण्याचे आदेश जारी केले आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य मध्यमवर्गीय प्रवाशांना दुरांतो एक्स्प्रेसने प्रवास करणे अतिशय सोयीचे ठरणार आहे.
रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतल्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार प्रवीण दटके व विकास कुंभारे, रेल्वे मंत्र्यांसह सर्व अधिकाऱ्यांचे ZRUCC, मध्य रेल्वे, मुंबई झोनने सदस्य ब्रजभूषण शुक्ल यांनी आभार मानले आहे.
सीएसएमटी-नागपूर- दुरांतो एक्सप्रेसमध्ये (12289/12290 ) झालेला बदल –
22 नोव्हेंबर पासून 2023 पासून ट्रेनची रचना बदलली आहे- (एकूण 23 ट्रेनचे डबे तेच राहतील). अ) पूर्वीची रचना- 23डबे- 15 – 3A कोच 3 – 2A कोच 1-1A कोच 2-स्लीपर कोच 2-पॉवर कार
ब) नवीन रचना- 23 कोच- 11-3A कोच 3 -2A कोच 1-1A कोच 6-स्लीपर कोच 2-पॉवर कार सारांश- 3A डबे 15 वरून 11 डबे कमी केले. स्लीपर कोच 2 वरून 6 डबे वाढले. रचना बदलण्याची तारीख 22/11/2023 (22 नोव्हेंबर) पासून ठेवली आहे.कारण त्या तारखेपर्यंत प्रवाशांकडून आगाऊ आरक्षण बुकिंग केले जाते, त्यामुळे त्या कालावधीपर्यंत त्याची रचना बदलता येणार नाही.