Published On : Thu, Dec 7th, 2017

दुरंतो एक्स्प्रेसने सोन्याची तस्करी

Advertisement

Rs 30 lakh Hawala cash, gold seized at Nagpur railway station
नागपूर: दुरंतो एक्स्प्रेसने सोन्याची तस्करी तसेच हवाला रक्कम घेवून जाणाºयाच्या आरपीएफ (गुन्हे) ने मुसक्या आवळल्या. त्याच्या ताब्यातून एक कोटी १० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ८ वर करण्यात आली. जप्त केलेला मुद्देमाल तसेच कुरीअर बॉयला आयकर विभागाच्या (अन्वेशन) सुपूर्द करण्यात आले. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. हवालाची रक्कम कोणाची, दागिने कोणाचे असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

आरपीएफने दिलेल्या माहिती नुसार श्याम बंकुवाले (३८), महेंद्र नाजुकराव तरोडे (३१, रा. कुटाला, अकोला) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या कुरीअर बॉयची नावे आहेत. ते दोघेही नागपुरातील इंद्रायनी कुरीअर अ‍ॅण्ड लॉजिस्टीक सर्व्हिस ( गांधीबाग) येथे काम करतात. महेंद्र अकोल्यात रहात असला तरी कुरीअर कंपनीने सामान पोहोचविण्यासाठी बोलाविल्यास तो त्या त्या वेळेवर यायचा आणि नियोजितस्थळी कुरीअरची डिलिव्हरी करायचा. अशी माहिती त्याने आरपीएफला दिली. मुंबई – नागपूर दुरंतो एक्स्प्रेसने सोने, चांदी आणि डायमंडची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती आरपीएफच्या पथकाला मिळाली. एस-७ बोगीतील ४९ क्रमांकाच्या बर्थवर असलेला श्याम दागिने घेवऊन नागपुरला येत असल्याची खात्री लायक माहिती असल्याने मध्य रेल्वेचे वरिष्ठ सुरक्षा आयुक्त ज्योतिकुमार सतीजा यांनी मुंबईचे वरिष्ठ सुरक्षा आयुक्त सचिन भालोदे यांची मदत घेतली. कसारा आणि इगतपूरी स्थानकावरुन काही जवान दुरंतोत चढले. ते श्यामवर पाळत ठेवून होते. आज सकाळी ९.१० वाजताच्या सुमारास नागपुरात गाडी येताच आधिच उपस्थित असलेल्या पथकाने श्यामला खाली उतरवून आरपीएफ ठाण्यात आनले. त्याच्या जवळ कॅरीबॅग, कॉलेज बॅग आणि एक छोटी बॅग होती. याबॅगमधील पॅकबंद असलेल्या २८ पॅकेटमध्ये ८० लाख २८ हजार रुपये किंमतीचे सोने, चांदी आणि डायमंड आढळले.

तसेच बुधवारी रात्री नागपूर – मुंबई दुरंतो एक्स्प्रेसने हवालाची रक्कम घेऊन एक इसम प्रवास करणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार आरपीएफने रात्री ८.३० वाजता होम प्लॅटफार्मवर उभ्या असलेल्या १२२९० नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसची तपासणीसुरू केली. आरपीएफचे पथक तपासणी करीत असताना त्यांनी कोच क्रमांक एस-६ , बर्थ क्रमांक ५७ वरून प्रवास करणारी व्यक्ती संशयास्पद वाटली. त्यामुळे पथकाने त्याचीचौकशी केली असता त्याने आपले नाव महेंद्र तरोडे (२८ रा. अकोला) असे सांगितले. तसेच महेंद्र इंद्रायणी कुरिअरसाठी ७ हजार रुपये मासिक वेतनावर कार्यरतअसून त्याला प्रत्येक ट्रीपसाठी ७०० रुपये अतिरिक्त दिले जात असल्याचे समजले. त्याने दिलेली माहिती समाधानकारक नसल्याने आरपीएफने त्यालाताब्यात घेऊन त्याच्याकडील ट्रॅव्हलिंग बॅगची तपासणी केली असता त्यात ३० लाख रुपये आढळून आलेत. त्यामध्ये २२ लाखांचे (२ हजाराच्या चलनी नोटा), आणि ८ लाख (५०० रुपयांच्या चलनी नोटा) आढळून आल्या. याप्रकरणी महेंद्रची कसून चौकशी केली असता ही रक्कम मुंबईला नेत असल्याचे त्याने सांगितले.

Advertisement
Today's Rate
Thursday 12 Dec. 2024
Gold 24 KT 78,500/-
Gold 22 KT 73,000/-
Silver / Kg 94,900/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दोन्ही संशयीत आरोपी उपरोक्त कुरीअर कंपनीत काम करतात. या दोघांनाही प्राप्तीकर विभागाच्या सुपूर्द केले. प्राप्तीकर विभागाच्या पथकाने त्या दोघांचेही बयान नोंदवून संपूर्ण मुद्देमाल ताब्यात घेतले. विशेष म्हणजे मुद्देमाला संबधी त्यांच्याकडे पाहिजे त्या प्रमाणात कागदपत्रे मिळून आली नाही. प्राप्तीकर विभागाच्या पुढील चौकशीत कुरीअर कंपनीला प्रत्येक मुद्देमालाचे कागदपत्रे सादर करावे लागतील. हे प्रकरण प्राप्तीकर विभागाच्या मुख्य कार्यालयाकडेही पाठविले जाईल. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योतिकुमार सतिजा यांच्या व्यूहरचनेनुसार झालेल्या कारवाईत आरपीएफ निरीक्षक भगवान इप्पर, सहायक उपनिरीक्षक संजय पुरकाम, प्रधान आरक्षक विजय पाटील, डी.डी. वानखेडे, किशोर चौधरी आणि निलकंठ गोरे यांनी केली.

Advertisement