Advertisement
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाला पुन्हा एकदा बॉम्बने उडवण्याची धमकीचा पुन्हा ई-मेल आल्याने खळबळ उडाली.
हा ईमेल प्राप्त झाल्यानंतर विमानतळावरील सुरक्षा वाढविण्यात आली आहे.विमानतळ परिसरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रवाशांसह त्यांना सोडण्यात येणाऱ्या वाहनांची कसून चौकशी करण्यात येत आहे.
दरम्यान नागपूरसह देशातील इतरही विमानतळांना उडविण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत.
अशा प्रकारचा ईमेल प्राप्त होण्याची गेल्या दोन महिन्यातील ही चौथी घटना आहे. यापूर्वी देखील देशातील 40 विमानतळांना उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.