Published On : Mon, May 1st, 2023
By Nagpur Today Nagpur News

शिक्षण विभागातील लिपिक सुनील ढोले, शिक्षक पवन झाडे यांना जामीन मंजूर

Advertisement

नागपूर : काही दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात सापळा रचून लाच प्रकरणात लिपिक व शिक्षकाला अटक केली. शाळेतील माध्यमिक वर्गाची शिफारस करण्यासाठी दोघांनी लाच मागितली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शिक्षण विभागातील वरिष्ठ लिपिक सुनील महादेवराव ढोले (५२) आणि शिक्षक पवन ईश्वर झाडे (44) यांचा समावेश होता. आता या प्रकरणी दोन्ही आरोपींना जामीन मंजूर झाला आहे.

माहितीनुसार , तक्रारदार हे चंद्रपूर येथील पोदार शाळेचे प्रतिनिधी आहेत. शाळेतील सहावी ते दहावीचे वर्ग वाढवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे अर्ज करण्यात आला होता. शिफारशी मंजूर करून घेण्यासाठी प्रतिनिधीने ढोले यांच्याशी संपर्क साधला. हे काम करून देण्यासाठी ढोले याने ५० हजार रुपयांची लाच मागितली होती . याप्रकरणी प्रतिनिधीने एसीबीकडे तक्रार केली. लिपिक सुनील ढोले, शिक्षकपवन झाडे यांना अटक करण्यात आली होती .

या प्रकरणी अ‌ॅड. कमल सतुजा आणि अ‌ॅड.कैलास दोडाणी यांनी न्यायालयात आरोपींची बाजू मांडली. यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की आरोपींना खोट्या गुन्ह्यात गुंतविण्यात आले आहे.दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर जि.प. न्यायाधीश, ACB आझमी साहेब यांनी या आरोपींना जामीन मंजूर केला आणि त्यांना तपासात सहकार्य करण्याचे आणि फिर्यादी साक्षीदारांशी छेडछाड न करण्याचे निर्देश दिले.

Advertisement