Published On : Mon, Oct 23rd, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात विजयादशमी निमित्त रावण, कुम्भकर्ण आणि मेघनाथ यांचे पुतळे दहनासाठी सज्ज

Advertisement

नागपूर : दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरातील ऐतिहासिक कस्तुरचंद पार्कवर रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कस्तूरचंद पार्क वर उद्या होणाऱ्या रावण दहन करता रावण, मेघनाथ आणि कुम्भकर्ण यांचे पुतळे उभारण्यात आले आहे. हे तिन्ही पुतळे दहनासाठी सज्ज झाले आहेत. रावण दहन कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस व केन्द्रीय मंत्री नितीन गड़करी यांची प्रमुख उपस्थिति राहणार आहे. रावण दहन बघण्यासाठी केवळ नागपूरच नव्हे तर नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोक देखील शहरात या उत्सवाला येतात. रावण दहन करण्यापूर्वी, रामायण थीमवर आधारित नाटक सादर केले जातात, त्यानंतर कुंभकर्ण, मेघनाथ आणि शेवटी रावण दहन केले जाणार आहे. कस्तुरचंद पार्कच नाही तर शहरात ठिकठिकाणी रावण दहन करण्यात येते.

रामायणातील दाखल्यांनुसार रावण अनेक ठिकाणी त्याच्या कृत्यांसाठी बदनाम आहे. असे असले तरी त्याच्या नितिमत्ता आणि वर्तन यांना काही गुण आपल्याला नक्कीच द्यावे लागतील. रावण हा राक्षसांचा राजा होता. त्याने केलेल्या चुकीच्या वर्तनाची शिक्षा म्हणून प्रभू रामचंत्रांनी त्याचा वध केला. त्याची आठवण म्हणून दसरा म्हणजेच विजयादशमी या दिवशी रावण दहन केले जाते.

Advertisement