Advertisement
नागपूर : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरल्याचे पाहायला मिळाले. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी आंदोलन करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. महाविकास आघाडीद्वारे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विधानभवन परिसरात आंदोलन करण्यात आलं. नेत्यांनी गळ्यात संत्री, वांगी याची माळ घालून आंदोलन केलं. शेतकऱ्यांच्या डोळ्याला पाझर, सरकार दाखवतंय गाजर, शेतकरी झाला कासावीस, खोके सरकार चारसो बीस, विमा कंपन्या झाल्या मालामाल, शेतकरी झाला कंगाल,बळीराजा अवकाळीने त्रस्त, सरकार मात्र जाहिरातीत व्यस्त, सरकार सांगते दुष्काळ सदृश्य, कारण सरकार आहे अदृश्य, अशा घोषणा देत विरोधकांनी विधानभवन परिसर दणाणून सोडला.